सातारा : गोठ्याला लागलेल्या आगीत २ रेडकांचा होरपळून मृत्यू

सातारा : गोठ्याला लागलेल्या आगीत २ रेडकांचा होरपळून मृत्यू
Published on
Updated on

कण्हेर : पुढारी वृत्तसेवा : साबळेवाडी (ता. सातारा) येथील दीपक भिकू बाबर या शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागून दोन रेडके होरपळून मृत झाली, तर एक म्हैस गंभीर जखमी झाली. या आगीमध्ये गोठा व ज्वारीच्या कडब्याचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना आज (दि.१९) दुपारी ४ च्या सुमारास घडली. शॉर्टसर्किटने ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, गोठ्यातून धुराचे लोट येऊ लागल्याने नागरिकांनी आरडाओरडा केला. गोठ्यात कडबा रचल्याने काही क्षणातच गोट्याने पेट घेतला. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. गावातील युवकांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. अखेर दूरध्वनीवरून नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला घटनेबाबत कळवले. अग्निशमन बंबाच्या सहाय्याने सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नातून आग आटोक्यात आणण्यात यश आले.

या आगीमध्ये दोन रेडके जळून जागीच ठार झाली. तर गाभण म्हैस सुमारे ८० टक्के भाजून गंभीर जखमी झाली आहे. म्हैशीवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पंचनामा करून बाबर यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news