मेडिकल परीक्षेची तयारी करत असलेल्या दिराने पुतण्या सारखा रडतो म्हणून वहिनीचा मुडदा पाडला | पुढारी

मेडिकल परीक्षेची तयारी करत असलेल्या दिराने पुतण्या सारखा रडतो म्हणून वहिनीचा मुडदा पाडला

भोपाळ; पुढारी ऑनलाईन : मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका २२ वर्षीय व्यक्तीने आपल्या वहिनीचा कथितरित्या भोसकून खून केला. आरोपीला पुतण्याच्या सततच्या रडण्याने राग आल्याने थेट वहिनीचा मुडदा पाडला. तो वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करत होता. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये ही भयंकर घटना घडली आहे.

गांधी नगर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अरुण कुमार शर्मा यांनी सांगितले की, कविता अहिरवार (२५) यांचा दीर मनोज अहिरवारने सोमवारी त्यांच्या घरात वार करून खून केला.

मनोज NEET (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) ची तयारी करत होता. त्याचा दोन वर्षांचा पुतण्या रडत होता. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने मृत कविताला बाळ रडणार नाही याची काळजी घे असे सांगितले होते, पण तिने त्याच्याशी रागाने बोलत दरडावले.

वहिनीने दरडावल्याने संतप्त झालेल्या आरोपीने स्वयंपाकघरातून चाकू काढला आणि तिच्यावर निर्दयीपणे वार करून तिची जागीच हत्या केली, असे पोलीसांनी सांगितले. आरोपी आणि पीडिताचा या प्रकरणावर यापूर्वीही वाद घातला होता आणि हल्ल्याच्या वेळी कुटुंबातील इतर सदस्य त्यांच्या दैनंदिन कामात व्यस्त होते.

नंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पीडितेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हे ही वाचलं का ?

Back to top button