सातारा : बहिणीला छेडल्याने डोक्यात दगड घातला - पुढारी

सातारा : बहिणीला छेडल्याने डोक्यात दगड घातला

सातारा : पुढारी वृत्तसेवा : बहिणीला का त्रास देतोय, अस म्हणत 21 वर्षीय युवकाच्या डोक्यात दगड घालून त्याला जखमी केल्याची घटना घडली. ही घटना सातारा रेल्वे स्टेशनवर घडली.

सातारा सिटी पोलिस : पोलिस पती, पत्नी भाजले, घटनेने खळबळ

या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. संशयित सर्वजण वाढे फाटा येथे राहत आहेत. हणमंत नडविन केरी (वय 21, रा. मूळ रा. काकणकी, ता. विजापूर कर्नाटक, सध्या रा. वाढे, ता. सातारा) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. चौघांपैकी एका संशयिताने माझ्या बहिणीला का त्रास देतोय, असे म्हणून त्याच्या डोक्यात दगड घातला. तर इतरांनी त्याला हाताने मारहाण केली. या प्रकारानंतर केरी याने सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

हे ही वाचलं का  

Back to top button