सातारा : जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचा आत्‍मदहनाचा प्रयत्‍न - पुढारी

सातारा : जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर महिलेचा आत्‍मदहनाचा प्रयत्‍न

सातारा : पुढारी वृत्तसेवा 

दत्तात्रय महाराज कळंबे जावली सहकारी बँकेच्या संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी अपहार करून फसवणूक केल्याचा आरोप नलावडे कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी ३ गुन्हे दाखल करण्‍यात आले आहेत. असे असतानाही पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल केले नााही. या कारणातून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नलावडे कुटुंबातील ज्योती नलावडे यांनी आत्‍मदहनाचा प्रयत्‍न केला. यावेळी पोलिसांनी संबंधित महिलेला अटकाव करत ताब्यात घेतले.

जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर बंदोबस्‍ताला असणाऱ्या पोलिसांसमोरच ज्‍योती नलावडे यांनी आत्‍मदहनाचा प्रयत्‍न केला. यावेळी पोलिसांनी त्‍यांच्या हातातील ज्‍वलनशील पदार्थ काढून घेत, त्‍यांना ताब्‍यात घेतले. अचानक घडलेल्‍या या प्रकारामुळे या ठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचलं का? 

Back to top button