कर्नाटक प्रवेशासाठी आता दोन डोससोबत आरटीपीसीआर आवश्यक | पुढारी

कर्नाटक प्रवेशासाठी आता दोन डोससोबत आरटीपीसीआर आवश्यक

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्रातून येणार्‍यांसाठी आता कोरोनाच्या दोन डोसबरोबरच आरटीपीसीआरचा निगेटिव्ह अहवाल सक्तीचा करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रविवारी दिली. सोमवारपासून कर्नाटकात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणास प्रारंभ करण्यात येत असून, याची संपूर्ण तयारी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री बोम्मई रविवारी (दि.२) रोजी दुपारी धारवाडला जाण्यासाठी बंगळूरहून येथील सांबरा विमानतळावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत आ. लक्ष्मण सवदी, आ. अनिल बेनके उपस्थित होते.

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना बोम्मई म्हणाले की, महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. कर्नाटकातून मुंबईला ये-जा करणार्‍यांची संख्या खूप आहे. यामुळे आम्ही दक्ष राहण्याची गरज आहे. यासाठी महाराष्ट्रातून येणार्‍यांना आता दोन डोसबरोबरच आरटीपीसीआरचा निगेटिव्ह अहवालसोबत आणणे सक्तीचे करण्यात आले आहे.

बेळगाव जिल्ह्यातील सर्व सीमावर्ती नाके आणि विजापूर जिल्ह्यातील ११ नाक्यांवर तपासणी कडक करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button