Latest
सांगली : मोटारीच्या दोरीवरुन भांडण, बापाने केला मुलाचा दगडाने ठेचून खून
कवठेमहांकाळ : पुढारी वृत्तसेवा; विहिरीतील पाण्याच्या मोटारीची दोरी कशासाठी आणली, यावरून झालेल्या भांडणात बापानेच मुलाचा दगडाने ठेचून खून केल्याचा प्रकार कुची (ता.कवठेमहांकाळ) (Sangali Murde) येथे शनिवारी दुपारी घडला. हणमंत वसंत माळी असे ठार झालेल्याचे नाव आहे.पोलिसांनी हणमंत याचे वडील वसंत रामू माळी व मोठा भाऊ मारुती वसंत माळी या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी दिली.
- जेलीफिशचा डंखही रोखू शकला नाही शुभम वनमाळीला, १४० किमी अंतर पार केले ५ दिवसांत
- राज्यात टीईटीपेक्षाही मोठा शिक्षक भरती घोटाळा, थेट भरती बंद असताना नेमले हजारो शिक्षक
कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यातून माहिती देण्यात आली, की हणमंत माळी याला दारूचे व्यसन होते. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास हणमंत हा दारू पिऊन घरी आला होता. मारुती याच्या विहिरीतील पाण्याच्या मोटारीची दोरी कशासाठी आणली, या कारणावरून तो भांडण करून शिवीगाळ करीत होता. मोठा भाऊ मारुती ते भांडण सोडवण्यासाठी पुढे गेला. त्याला हणमंत याने शिवीगाळ केली. त्यामुळे मारुतीने त्याला हाताने मारहाण केली. वडील वसंत माळी याने काठीने मारहाण करून ढकलून दिले. नंतर खाली पाडून दोन-तीन वेळा हणमंत याच्या डोक्यात दगडाने मारून जखमी केले. त्या मारहाणीत हणमंत हा ठार झाला. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांनी भेट दिली. फिर्याद हणमंत याची आई सुभद्रा माळी यांनी दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी करे करीत आहेत.
हेही वाचलत का ?
- सांगली : झेडपी अभियंत्याच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी; ४ खासगी सावकारांना अटक
- TET Paper Scam : टीइटी पेपर घोटाळ्यातील आरोपी अश्विन कुमारच्या घरातून दोन किलो सोने, २५ किलो चांदी जप्त
- एकनाथ खडस यांच्याकडून जिवीतास धोका : मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप
- udyanraje vs shivendraraje : उदयनराजेंची टीका 'काय बाई सांगू कसं गं सांगू' यावर शिवेंद्रराजे म्हणतात, गळ्यात पडायचं पप्या घ्यायचं…
- Omicron : ओमायक्रॉनला रोखण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्रासह १० राज्यांत पाठविणार तज्ज्ञांची पथके
- Farm Laws : फक्त एक पाऊल मागे घेतले आहे, कृषी कायदे पुन्हा आणण्याचे कृषी मंत्र्यांनी दिले संकेत
- Farm Laws : फक्त एक पाऊल मागे घेतले आहे, कृषी कायदे पुन्हा आणण्याचे कृषी मंत्र्यांनी दिले संकेत

