Jhunjhunwala meets pm modi : पीएम मोदी आणि झुनझुनवाला यांची भेट, मोदी म्हणाले वन अँड ओन्ली झुनझुनवाला | पुढारी

Jhunjhunwala meets pm modi : पीएम मोदी आणि झुनझुनवाला यांची भेट, मोदी म्हणाले वन अँड ओन्ली झुनझुनवाला

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

Jhunjhunwala meets pm modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काल (दि.०६) मंगळवारी शेअर बाजारातील बादशहा मानले जाणारे राकेश झुनझुनवाला यांच्यासोबत भेट झाली. त्यांच्या भेटीचे विविध फोटो सोशल मीडियावर शेअर पंतप्रधान मोदींनी ट्विटरवर शेअर केले आहेत.

यावेळी पीएम मोदी म्हणाले की झुनझुनवाला हे भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल खूप आशावादी आहेत. वन अँड ओन्ली राकेश झुनझुनवाला यांना भेटून खुप आनंद झाल्याचे पीएम मोदी म्हणाले. उद्याच्या भारताबद्दल उत्साही, अंतर्दृष्टी आणि अत्यंत आशावादी, असल्याचे मोदींनी ट्विट केले.

Jhunjhunwala meets pm modi : २२५ शेअर बाजारातील बादशहा झुनझुनवाला

राकेश झुनझुनवाला हे शेअर बाजारातील बादशहा म्हणून संबोधले जातात. त्याची स्वतःची रेअर एंटरप्रायझेस नावाची कंपनी आहे. नुकतेच राकेश झुनझुनवाला याच्या कंपनीने झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसचे २२५ कोटींचे समभाग खरेदी केले होते.

रेअर एंटरप्रायझेसने बल्क डीलमध्ये २२०.४४ च्या दराने ५० लाख शेअर्स खरेदी केले होते. दुर्मिळ उपक्रमांचे शेअर व्यवहार मूल्य ११०.२२ कोटी रुपये होते.

पीएम ना जियो क्वाक्यूरेली यानांही भेटले

याचबरोबर पंतप्रधान नरेंद मोदी यांनी काल क्यूएस क्वाक्वेरेली सायमंड्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी ना जियो क्वाक्युरेली यांच्यासोबतही चर्चा केली होती.

पीएम मोदी म्हणाले की शिक्षण क्षेत्रात नवीन काही बदल करता येतील का याबाबत विस्ताराने चर्चा केली.

Back to top button