Income Tax Raids : मुंबई, पुणे, नागपूरमध्ये छापेमारी, राजकीय नेत्यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई | पुढारी

Income Tax Raids : मुंबई, पुणे, नागपूरमध्ये छापेमारी, राजकीय नेत्यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई

मुंबई; पुढारी ऑनलाईन : Income Tax Raids : राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर येथील काही उद्योजक आणि राजकीय नेत्यांच्या निकतवर्तीयांच्या मालमत्तांवर आयकर विभागाने छापे टाकले असल्याचे वृत्त आहे. आयकर विभागाची ही मोठी कारवाई मानली जात आहे.

बारामती औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीसह तालुक्यातील काटेवाडी येथे गुरुवारी (दि. ७) केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापेमारी सुरु आहे. ईडी अथवा आयकर विभागाकडून (Income Tax Raids) ही छापेमारी सुरु असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान गुरुवारी सकाळपासूनच सुरु झालेल्या या छापेमारीमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

अधिक मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील एका पॉवरफुल्ल नेत्याच्या नगर जिल्ह्यातील एका खासगी कारखान्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या निकटवर्तीयाची केंद्रीय पथकाकडून चौकशी केली जात आहे. काटेवाडीत हा निकटवर्तीय राहतो. दुसरीकडे बारामती एमआयडीसीतील एका आंतरराष्ट्रीय कंपनीत एक पथक पोहोचले आहे. त्यांच्याकडून कंपनीत तपासणी केली जात आहे.
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या बारामती दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी ही छापेमारी सुरु झाल्याने विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

हे ही वाचा :

Back to top button