bjp national executive : आशीष शेलार, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चित्रा वाघ यांना संधी - पुढारी

bjp national executive : आशीष शेलार, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चित्रा वाघ यांना संधी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : bjp national executive : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षाच्या 80 सदस्यीय कार्यकारिणीची घोषणा केली असून कार्यकारिणीतून वरिष्ठ नेत्या मनेका गांधी तसेच त्यांचे पूत्र खा. वरुण गांधी यांची गच्छंती करण्यात आली आहे.

अलिकडील काळात मनेका गांधी यांनी पक्षाच्या काही धोरणांवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. तर वरुण गांधी यांनी लखीमपूर खिरी येथील हिंसाचारावरुन भाजपशासित उत्‍तर प्रदेश सरकारवर जोरदार टीका केली होती.

मनेका गांधी या उत्‍तर प्रदेशातील सुलतानपूरच्या खासदार आहेत तर वरुण गांधी हे पिलीभीत मतदारसंघाचे खासदार आहेत. कार्यकारिणीत ज्या मान्यवरांचा समावेश आहे, त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री व विविध राज्यांतील भाजप नेत्यांचा समावेश आहे.

नियमित 80 सदस्यांशिवाय विशेष निमंत्रित म्हणून 50 सदस्यांची तर कायमचे निमंत्रित म्हणून 179 नावांची घोषणा करण्यात आली आहे. महत्वाचे विषय तसेच धोरणांवर चर्चा करुन त्यासंदर्भात सरकार आणि पक्ष संघटनेला सल्ला देण्याचे काम भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी करते.

bjp national executive : कार्यकारिणीत गडकरी, गोयल, वाघ यांचा समावेश

कोरोना संकटामुळे राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यास वेळ लागल्याचे पक्ष सूत्रांकडून सांगण्यात आले. कार्यकारिणीत ज्या अन्य प्रमुख नेत्यांचा समावेश आहे, त्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय मंत्रिमंडळात नव्यानेच सामील झालेले अश्‍विनी वैष्णव यांचा समावेश आहे.

याशिवाय मंत्रिमंडळातून वगळण्यात आलेल्या प्रकाश जावडेकर, रवीशंकर प्रसाद, हर्षवर्धन या नेत्यांनाही स्थान देण्यात आले आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीत bjp national executive महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पियुष गोयल, विनय सहस्त्रबुध्दे, चित्रा वाघ यांना संधी देण्यात आली आहे.

राष्ट्रीय सचिव म्हणून सुनील देवधर, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. विशेष निमंत्रितांमध्ये सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, लाडाराम नागवानी यांचा समावेश आहे. राष्ट्रीय प्रवक्‍ते म्हणून ज्यांची नियुक्‍ती झाली आहे, त्यात हीना गावित (महाराष्ट्र), संजू वर्मा (मुंबई) यांचा समावेश आहे.

युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी कर्नाटकचे नेते तेजस्वी सूर्या यांची नियुक्‍ती झाली आहे. महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी तामिळनाडूच्या वनती श्रीनिवासन, ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी तेलंगणचे डॉ. के. लक्ष्मण, किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी उत्‍तर प्रदेशचे राजकुमार चहर. एससी मोर्चा अध्यक्षपदी मध्य प्रदेशचे लालसिंग आर्य, एसटी मोर्चा अध्यक्षपदी झारखंडचे समीर ओरान, अल्पसंख्याक मोर्चा अध्यक्षपदी महाराष्ट्रातील जमाल सिद्दीकी यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button