T20 world cup 2021 : सीमेवर असो किंवा कोणत्याही खेळाच्या मैदानात असो भारत आणि पाकिस्तान सामने हे हाय व्होल्टेज होतातच. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याकडे दोन्ही देशांसह जगाचे लक्ष असते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात मागच्या कित्येक वर्षात मालिका झाली नाही. पण आगामी टी-२० विश्वचषकासाठी दोन्ही देश आमने सामने येणार आहेत. २४ ऑक्टोबर २०२१ ला टी-२० विश्वचषकात हा हाय व्होल्टेज सामना होणार आहे.
भारतासोबत विश्वचषकातील सामना जिंका आणि पाहिजे तेवढी रक्कम कोऱ्या चेकवर लिहा, अशी थेट ऑफर एका पाकिस्तानी उद्योगपतीने दिली. अशी माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा प्रमुख रमीज राजा याने दिली.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यात टी-२० विश्वचषकाच्या निमित्ताने ५ सामने झाले. यामध्ये भारताने पाकिस्तान्यांना माती चारून घरी पाठवलं आहे. पाकिस्तान स्टॉक एक्स्चेंज येथे दिलेल्या भेटीदरम्यान रमीज राजाने ही माहिती दिली.
पाकिस्तानच्या माजी खेळांडूसोबत आजी खेळाडूही भारतीय संघ यावेळी सामना जिंकू शकणार नसल्याचे छातीठोक पणे सांगत फिरत आहेत.
आम्ही यंदाचे भारताविरुद्धचे सामने जिंकून इतिहास बदलणार असल्याचा दावा पाकिस्तान खेळाडूंकडून केला जात आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या उद्योगपतीने पाकिस्तान क्रिकेट मंडळाला या सामन्यावरून मोठी ऑफर दिली आहे. नवीन अध्यक्ष रमीझ राजानी ही माहिती दिली.
पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा उदरनिर्वाह हा आयसीसीकडून येणाऱ्या ५० टक्के निधीतून चालतो. याचबरोबर आयसीसीसाठी येणारा ९० टक्के निधी हा भारतीय क्रिकेट मंडळाकडून येतो.
भारताकडून हा निधी यायचा बंद झाल्यास पाकिस्तान क्रिकेट मंडळाची परिस्थिती बिकट होईल अशी भितीही रमीझ राजाने व्यक्त केली. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटला बळकट करण्याचा माझा प्रयत्न करणार असल्याची माहिती राजाने दिली.
विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी; राखीव खेळाडू – श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर व दीपक चहर.
बाबर आझम, आसीफ अली, खुशदील शाह, मोहम्मद हाफिज, सोहैब मक्सूद, आझम खान, मोहम्मद रिझवान, इमाद वासीम, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वासीम, शाबाद खान, हॅरीस रौफ, हसन अली, मोहम्मद हस्नैन, शाहिन शाह आफ्रिदी.