Barabanki Accident : उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये म्हैस आडवी आल्याने भीषण अपघात, ९ जणांचा जागीच मृत्यू | पुढारी

Barabanki Accident : उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये म्हैस आडवी आल्याने भीषण अपघात, ९ जणांचा जागीच मृत्यू

बाराबंकी : पुढारी ऑनलाईन

उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथे सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला. (Barabanki Accident) या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू आणि २७ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. खासगी प्रवासी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक बसल्याने हा अपघात झाला. बस आणि ट्रकची एवढ्या जोरात धडक होती की बसचा चक्काचूर झाला. यात ९ जणांचा मृत्यू झाला. तर २७ प्रवाशी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Barabanki Accident : लोकांचा आक्रोश अनावर

बाराबंकीच्या देवा पोलिस ठाणे परिसरातील बबुरी गावाजवळ ही दुर्घटना घडली. किसान पथ रिंग रोड येथे ही दुर्घटना घडली. बस आणि ट्रक भरधाव वेगाने जात होते. यामध्ये समोरासमोर त्यांची धडक झाली. म्हैस आडवी आल्याने ट्रक चालकाचे आणि बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडला.

या घटनेमुळे परिसरात अचानक बचावासाठी धावाधाव सुरू होती. या अपघातात बचावलेल्या लोकांना आक्रोश अनावर झाला होता.

बसमध्ये ७० प्रवाशी, मृतांचा आकडा वाढणार

दिल्लीतून पर्यटनासाठी निघालेल्या बसचा हा अपघात झाला आहे. दरम्यान या बसमध्ये जवळजवळ ७० प्रवाशी होते. बस बहराईच या पर्यटनस्थळी जात असताना ही घटना घडली. बसला धडकलेला ट्रक हा वाळूची वाहतूक करत असल्याची माहिती बाराबंकी पोलिस अधीक्षकांनी दिली.

या अपघातात ९ जणांचा जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती बाराबंकीच्या पोलीस अधिक्षकांनी दिली. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले. जखमींना तात्काळ जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस आणि प्रशासनाची टीम सर्वोतोपरी मदतीसाठी तैनात असल्याचे पोलिस अधिक्षक यांनी माहिती दिली.

 

Back to top button