सांगली : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद | पुढारी

सांगली : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद

इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा : युवा पिढी ही देशाचे भविष्य आहे. त्यामुळे तुम्ही ज्या क्षेत्रात करीअर करणार अहात त्यात प्रामाणिकपणे व मेहनतीने काम करुन देशाचा नावलौकिक आणखी वाढवा , असे आवाहन केंद्रीय नागरिक हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी विद्यार्थ्यांना केले. पेठ येथील नानासाहेब महाडीक शिक्षण संकुलातील विद्यार्थांशी गुरुवारी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी विद्यार्थांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधला तसेच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तरे दिली.

Exclusive: पोलिसांच्या ताब्यातील गाडीच चोरट्यांनी पळवली, पोलिस आयुक्तांना चौकशीचे मोक्का न्यायालयाचे आदेश

यावेळी मंत्री सिंधिया म्हणाले, २०१३ साली जगात भारताची आर्थीक सत्ता ११ व्या क्रमांकावर होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ वर्षात ती ५ व्या क्रमांकावर आणली आहे. देशाचे भविष्य तुमच्याही हातात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा ११ व्या वर्षी सुरु झाली. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नेहमी वाटचाल करा. कठोर परीश्रमाशिवाय यश मिळत नाही. त्यामुळे कष्ट करण्याची तयारी ठेवा. राजकारण हे दलदल आहे, असे ज्यांना वाटते त्यांनी मतदानातून परीवर्तन घडवत, चांगल्या लोकांना विवडून देवून ही दलदल कमी करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे, राहुल महाडीक, सम्राट महाडीक, निशिकांत पाटील, सत्यजीत देशमुख, भगवानराव साळुंखे, सी.बी. पाटील, कपील आोसवाल, जयराज पाटील, डाँ. सचिन पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button