अनिल परब यांना ईडीचा दणका; दहा कोटींची मालमत्ता जप्त | पुढारी

अनिल परब यांना ईडीचा दणका; दहा कोटींची मालमत्ता जप्त

पुढारी ऑनलाईन डेस्क : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी मंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची दापोली, रत्नागिरी येथील 10.20 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरत्या स्वरुपात जप्त केली आहे. अवैध बांधकाम केलेल्या साई रिसॉर्ट, आणि मनी लाँड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात ईडीने ही कारवाई केली आहे.

ईडीने जप्त केलेल्या जमिनीची किंमत 2,73,91,000 रुपये आहे. तर ज्या जागेवर साई रिसॉर्ट एनएक्स बांधले गेले आहे. त्याची किंमत 7,46,47,000 रुपये आहे. साई रिसॉर्ट बेकायदा बांधकामाबाबत अनेक तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये अनिल परब परिवहन आणि संसदीय कामकाज मंत्री होते. मनी लाँड्रिंग आणि बेकायदा साई रिसॉर्टचे बांधकाम केल्याचा आरोप परब यांच्यावर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर परब यांनी सोमय्या यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला होता. दरम्यान, सोमय्या यांनी परब यांच्यावर दापोलीत बेकायदा हॉटेल बांधल्याच्या आरोपावर ठाम होते. हे बांधकाम पाडण्यासाठी सोमय्या यांनी दापोलीत जाऊन आंदोलनही केले होते. तर परिवहन विभागात बदलीचे रॅकेट चालवल्याचा आरोपही सोमय्या यांनी परब यांच्यावर केला होता.

हेही वाचलंत का ? 

Back to top button