अनिल परब यांच्यावर रिसॉर्ट प्रकरणी गुन्हा दाखल | पुढारी

अनिल परब यांच्यावर रिसॉर्ट प्रकरणी गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाईन : दापोली रिसॉर्ट फसवणूक प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि माजी राज्यमंत्री अनिल परब यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम 420 आणि 34 अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती दापोली पोलिसांनी दिली आहे.

रायगड जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये मुरुड येथे उभारलेलेे त्यांचे बहुचर्चित साई रिसॉर्ट व सी कौंच रिसॉर्ट तोडण्याचे आदेश केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयाने दिले आहेत. विशेष म्हणजे सीआरझेड कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल सी कौंच रिसॉर्टला 37 लाख 91 हजार 250 रुपये व साई रिसॉर्टला 25 लाख 27 हजार 500 रुपये दंड देखील ठोठावण्यात आला होता.

पर्यावरणाशी संबंधित तज्ज्ञ अधिकार्‍यांच्या पथकाने मुरुड येथील या दोन रिसॉर्टची पाहणी केली होती. त्यानंतर त्याचा अहवाल पर्यावरण मंत्रालयाला सादर करण्यात आला. या अहवालाच्या आधारे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने 22 ऑगस्टला महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अ‍ॅथॉरटीचे सदस्य सचिव व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव यांना पत्र पाठवले आहे. त्यामुळे आता साई रिसॉर्टवर हातोडा चालवला जाणार हे पक्के झाले होते.

हेही वाचा:

Back to top button