Rolls-Royce च्या इलेक्ट्रिक विमानाची यशस्वी चाचणी, टॉप स्पीड ४८२ Kmph!

Rolls-Royce च्या इलेक्ट्रिक विमानाची यशस्वी चाचणी! ४८२ Kmph टॉप स्पीड
Rolls-Royce च्या इलेक्ट्रिक विमानाची यशस्वी चाचणी! ४८२ Kmph टॉप स्पीड
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन : Rolls-Royce : जगात केवळ ऑटोमोबाईल क्षेत्रच नाही, जिथे विविध कंपन्या सतत आधुनिक तंत्रज्ञानावर संशोधन करत आहेत, परंतु विमानचालन क्षेत्रानेही या दिशेने बरीच प्रगती केली आहे.

तुम्ही इलेक्ट्रिक कार किंवा इलेक्ट्रिक दुचाकी रस्त्यावर धावताना पाहिल्या असतील, पण तुम्ही इलेक्ट्रिक विमान पाहिलं आहे का? नसल्यास, आपण लक्झरी कार निर्माता रोल्स-रॉयसद्वारे उत्पादित इलेक्ट्रिक विमान एकदा पाहुन घ्यावे. खुशखबर म्हणजे कंपनीने आपल्या सर्व इलेक्ट्रिक विमानांचा पहिला यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे.

रोल्स रॉयसने या सर्व इलेक्ट्रिक विमानांना स्पिरिट ऑफ इनोव्हेशन असे नाव दिले आहे. कंपनीने या विमानाचे पहिले यशस्वी उड्डाण देखील केले आहे. हे उड्डाण १५ मिनिटांचे होते.

या उड्डाणाबरोबरच रोल्स रॉयस कंपनीने हे स्पष्ट केले आहे की, हवेत उडणारी इलेक्ट्रिक विमाने पाहण्याची वेळ आता दूर नाही. रोल्स रॉयसच्या मते, चाचणीचा मुख्य फोकस स्पिरिट ऑफ इनोव्हेशनच्या इलेक्ट्रिकल आणि प्रोपल्शन सिस्टमवर असेल.

स्पिरिट ऑफ इनोव्हेशन हे सिंगल सीट विमान आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, कोणत्याही विमानाच्या तुलनेत त्याच्याकडे आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली बॅटरी पॅक आहे.

विमान 6000 सेल बॅटरी पॅकवर काम करते. आणि यात लावण्यात आलेली इलेक्ट्रीक मोटार जवळपास 500 एचपी वीज निर्माण करण्यास सक्षम आहे. रोल्स रॉयसने म्हटले आहे की, हे विमान ताशी 300 मैल (सुमारे 483 किलोमीटर प्रति तास) च्या सर्वोच्च वेगाने उडू शकते.

एअर टॅक्सी विकसित करण्यासाठी रोल्स रॉयसने Tecnam (टेकनम) नावाच्या कंपनीसोबत भागीदारी केली आहे. रोल्स-रॉयस आणि एअरफ्रेमर टेकनम सध्या स्कॅन्डिनेव्हियाची सर्वात मोठी प्रादेशिक एअरलाईन, विडेरी सोबत काम करत आहे. जेणेकरून या नव्या इनोव्हेशनच्या माध्यमातून एक ऑल-इलेक्ट्रिक प्रवासी विमान वितरित केले जाऊ शकेल. यामुळे 2026 मध्ये रेवेन्यू सेवेसाठी हे विमान तयार करण्याची योजना आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news