

भिलवडी ; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यात कर्जास कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अंकलखोप (ता. पलूस) येथील कर्जास कंटाळून दोन शेतकऱ्यांची आत्महत्या घटनेने सांगली जिल्हा हादरला आहे. कर्जबाजारीपणाला कंटाळून गणेश बाळासाहेब सूर्यवंशी (वय ४०) आणि गणपती रावसाहेब चौगुले (वय ४५) अशी त्यांची नावे आहेत.
अंकलखोप येथील औदुंबर परिसरामध्ये राहणार्या गणेश सूर्यवंशी यांनी रविवारी रात्री झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. सूर्यवंशी हे शेतीबरोबरच भाड्याने गाडी चालवत होते.
लॉकडाऊन, महापुरामुळे त्यांचा व्यवसाय बंद होता. ते आर्थिक व मानसिकद़ृष्ट्या खचले होते. निराशेतूनच त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली.
अंकलखोपमधील गहिनीनाथनगर येथील गणपती चौगुले यांनी रविवारी रात्री घरात कोणी नसताना पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. चौगुले यांनीही कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. दोन्ही घटनांची नोंद भिलवडी पोलिस ठाण्यात झाली आहे.
एकाच दिवशी वेगवेगळ्या कुटुंबातील दोन शेतकर्यांनी आत्महत्या केल्याने कृष्णा काठावर खळबळ उडाली आहे.
हेही वाचलं का ?