राजनाथ सिंह यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून राष्ट्रवादीने पोस्टाने पाठवले शिवचरित्र | पुढारी

राजनाथ सिंह यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून राष्ट्रवादीने पोस्टाने पाठवले शिवचरित्र

घाटकोपर : पुढारी वृत्तसेवा

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पुणे येथील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांना खेळाचे शिक्षण रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांनी दिले, असा दाखला  दिला होता. त्यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ देशभर प्रतिक्रिया उमटत आहे. मुंबईतही घाटकोपर परिसरात आज ( दि ३० ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अ‍ॅड. अमोल मातेले यांच्या नेतृत्वात घाटकोपर रेल्वे स्थानक जवळ पोस्ट ऑफिस कार्यालय समोर हे आंदोलन छेडण्यात आले.

राष्ट्रवादीने घोषणा देताना राजनाथ सिंहांनी दिलेला ऐतिहासिक दाखला खोडून काढला. राष्ट्रवादीने आंदोलन करीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल दिलेल्या दाखल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. छत्रपती शिवाजी महाराज यांना गुरूस्थानी फक्त त्यांचे वडील शहाजीराजे, राजमाता जिजाऊच होत्या. त्यांनीच त्यांना तलवारबाजी, दांडपट्टा तसेच कला आणि राजकारणाचे धडे दिले. त्यांना सर्व विद्यांत निपुण केले.

महात्मा जोतीराव फुले, शाहीर अमरशेख, ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी इतिहासाची जी काही मांडणी केली आहे त्यात याचे सत्य आणि वास्तवावर आधारित दाखले सापडतात, देशाचे संरक्षण मंत्री या नात्याने राजनाथ सिंह यांनी कुणीही लेखी धादांत खोटा दिलेला इतिहास वाचण्याचे काम केले. यामुळे समाजात तेढ निर्माण झाली असून याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. अशा प्रतिक्रिया अ‍ॅड. अमोले मातेले यांनी दिली आहे.

घाटकोपर रेल्वे स्थानकासमोरील भारतीय टपाल कार्यालयात राजनाथ सिंह यांच्या ऐतिहासिक ज्ञानात भर पडावी, त्यांनी खरा इतिहास समजून घ्यावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाचा आलेख मांडणारे शिवचरित्र त्यांना पोस्टाने पाठवण्यात आले.

हेही वाचले का? 

Back to top button