आता जॅकलिन फर्नांडिसला ईडीकडून दणका! कोणत्या प्रकरणात चौकशी सुरु? | पुढारी

आता जॅकलिन फर्नांडिसला ईडीकडून दणका! कोणत्या प्रकरणात चौकशी सुरु?

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अंमलबजावणी संचालनालया अर्थात ईडीकडून गेल्या ५ तासांपासून तिची दिल्लीत चौकशी सुरू असल्याचे वृत्त समोर आले आहे.

जॅकलीनच्या आधी, ईडीने ७ जुलै रोजी मनी लाँडरिंग प्रकरणात अभिनेत्री यामी गौतमचीही चौकशी केली होती.

मनी लाँडरिंग प्रकरणी जॅकलीनची चौकशी करण्यात येत आहे. तिचा जबाब नोंदवला जात. हे प्रकरण सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित आहे. सुकेश याच्यावर मनी लाँडरिंग अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

२३ ऑगस्ट रोजी ईडीने चेन्नई स्थित सुकेश चंद्रशेखर आणि चित्रपट अभिनेत्री लीना पॉल यांच्या बंगल्यावर छापा टाकला, ज्यांनी तिहार जेलमधून सर्वात मोठी खंडणी (२०० कोटी) वसूल केली होती.

ईडीने कोस्ट रोडवरील सुकेश याच्या बंगल्यावर छापा टाकला होता. त्या बंगल्याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे सांगण्यात आले होते. छाप्यादरम्यान कारवाई करत, ईडीने मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली आणि सुमारे १५ आलिशान वाहने देखील जप्त केली.

सुकेशने तिहार कारागृहातून एका मोठ्या व्यावसायिकाच्या पत्नीकडून सुमारे २०० कोटी रुपये उकळले होते. ज्यामध्ये आरबीएल बँकेच्या अधिकाऱ्यांसह तिहार प्रशासनातील काही लोकांना अटक करण्यात आली.

ईडीने सुकेशच्या जवळची सहकारी लीना पॉलचीही चौकशी केली. सुकेशला खंडणी प्रकरणात स्पेशल सेलने अटक केली होती, तो सध्या ईओडब्ल्यूच्या ताब्यात आहे. विशेष म्हणजे, सुकेश हा एआयडीएमके (AIDMK) प्रतीक प्रकरणात आरोपी आहे आणि बराच काळ तुरुंगात आहे.

दरम्यान, ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला अभिनेता अरमान कोहलीची कोठडी १ सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. काही वेळापूर्वी त्याला ड्रग पॅडलर अजय सिंहसह विशेष एनडीपीएस कोर्टात हजर करण्यात आले.

पोलिसांच्या माहितीनुसार हाय प्रोफाईल चीटर सुकेश तुरुंगातून एका मोठ्या व्यावसायिकाच्या संपर्कात होता आणि सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयात प्रकरण मिटवण्याचा दावा करून फोन करून पैसे उकळत होता.

कारागृहात मोबाईल सापडल्यानंतर जेल प्रशासनाशी संबंधित काही अधिकारी रडारवर आले होते. सुकेश तीच व्यक्ती आहे, ज्याने AIADMK चे नेते टीटीव्ही दिनाकरन यांच्याकडून २ कोटी रुपये घेऊन निवडणूक चिन्ह मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.

प्रकरण उघडकीस आल्यावर गुन्हे शाखेने सुकेशला अटक केली आणि सुकेशच्या माहितीवरून टीटीव्ही दिनाकरनला याही अटक करण्यात आली.

Back to top button