सांगली : मेळाव्यात 285 जणांना रोजगार | पुढारी

सांगली : मेळाव्यात 285 जणांना रोजगार

सांगली; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात 285 उमेदवारांना रोजगार मिळाला. फेरमुलाखतीसाठी 356 उमेदवारांना बोलावले आहे. दरम्यान, रोजगारासाठी 2 हजार 650 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. एमआयडीसी, बँकिंग, ऑटोमोबाईल, शेती, मार्केटिंग, फायनान्स क्षेत्रातील रोजगाराची संधी उपलब्ध करण्यात आली होती.

महानगरपालिका व दीनदयाळ अंत्योदय राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियानतर्फे वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे रोजगार मेळावा आयोजित केला. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्याहस्ते उद्घाटन झाले. स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, सभागृह नेते विनायक सिंहासने, उपायुक्त चंद्रकांत आडके प्रमुख उपस्थित होते.

या रोजगार मेळाव्यासाठी 71 नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला. या रोजगार मेळाव्यास 2 हजार 650 तरुण, तरुणींनी नोंदणी केली. 1 हजार 60 उमेदवारांची मुलाखत झाली. त्यामधून 285 उमेदवारांची निवड करण्यात आली. फेरमुलाखतीसाठी 356 उमेदवारांना बोलवण्यात येणार आहे. रोजगार मेळाव्याचे नियोजन ज्योती सरवदे, मतीन अमीन, किरण पाटील, सदाशिव हंकारे, समूह संघटिका वंदना सव्वाखंडे, शाहीन शेख, संपदा मोरे तसेच मारुती गायकवाड आणि विवेक चव्हाण यांनी केले.

Back to top button