सांगली : कुंडलापुरात दोघांना मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

सांगली : कुंडलापुरात दोघांना मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल

कवठेमहांकाळ : पुढारी वृत्तसेवा कुंडलापूर (ता. कवठेमहांकाळ) येथे किरकोळ कारणावरुन दोघांना मारहाण करण्यात आली. मंगळवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी विश्वास बाबुराव मंडले यांनी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तानाजी मंडले व त्यांचा मुलगा रमेश मंडले, उमेश मंडले, पत्नी मालन मंडले या चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विश्वास मंडले यांच्या घरी कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाचा नैवद्य घेऊन ते मंदिरात जात होते. त्यावेळी संशयितांनी विश्वास यांना मारहाण केली. विश्वास यांच्या काकी सोडविण्यास गेल्या असता त्यांनाही मारहाण करण्यात आली.

हेही वाचलतं का?

Back to top button