सांगली : मिरजेत तिघांवर रॉडने हल्ला | पुढारी

सांगली : मिरजेत तिघांवर रॉडने हल्ला

मिरज, पुढारी वृत्तसेवा :  येथील इंदिरानगर येथे कामगारास सेंट्र्रिंग कामावरून बोलावल्याच्या वादातून तिघांवर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. याबाबत शहर पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यांत आला आहे. याप्रकरणी अमोल रणधीर, मनोज रणधीर, पप्पू खवळे, राजेश ननावरे, स्वप्नील घस्ते या चौघांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी : शशिकांत रामा कांबळे, रवींद्र रामा कांबळे व रोहित आनंदा पांडव हे सेंट्रिंगचे काम करतात. त्यांच्याकडे कामाला असलेल्या राजेश ननावरे याने कामापोटी रक्कम आगाऊ घेऊनही तो कामाला येत नव्हता. वरील तिघे त्याला कामाला बोलविण्यासाठी बुधवारी सकाळी गेले होते. इंदिरानगर येथील अमोल रणधीर याच्याकडे राजेश हा काम करीत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर कांबळे यांनी त्याला कामावर परत बोलविले. यामुळे अमोल रणधीर, मनोज रणधीर, पप्पू खवळे, राजेश ननावरे, स्वप्नील घस्ते यांनी लोखंडी रॉडने हल्ला केल्याने तिघेजण जखमी झाले.

शशिकांत कांबळे व रवींद्र कांबळे यांच्या हाताला व अंगाला दुखापत झाली. रोहित पांडव याच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली. याबाबत मिरज शहर पोलिसात तक्रार देऊन तिघे उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल झाले. मात्र अमोल रणधीर व त्याच्या साथीदारांनी पुन्हा रुग्णालयात येऊन तक्रार मागे घे, नाहीतर जीवे मारणार असल्याची धमकी दिल्याची तक्रार शशिकांत कांबळे व रवींद्र कांबळे यांनी पोलिसांत केली आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button