पैठण तहसील कार्यालयातील बायोमेट्रिक मशीन फक्त नावालाच | पुढारी

पैठण तहसील कार्यालयातील बायोमेट्रिक मशीन फक्त नावालाच

पैठण ( औंरगाबाद); पुढारी वृत्तसेवा: पैठण येथील तहसील कार्यालयामधील कार्यरत कर्मचारी कार्यालयीन वेळेच्या आत उपस्थित राहावे यासाठी बायोमेट्रीक बायोमेट्रिक हजेरी मशीन लावण्यात आलेली आहे. परंतु, ही मशीन फक्त नावालाच लावण्यात आल्यामुळे कामचुकार लेटलतिफांची कर्मचाऱ्याची संख्या वाढत चालली आहे. याोउलट कामचुकार कर्मचाऱ्यांची तक्रार केल्यास सर्वसामान्य नागरिकांना दमदाटी करून तहसील कार्यालयातील काम जाणून-बुजून रेंगाळत ठेवण्याचा प्रकार वारंवार घडत आहेत.

पैठण तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेच्या आत उपस्थित राहून नागरिकाचे कामकाज करावे यासाठी बायोमेट्रिक हजेरी मशीन लावण्यात आलेली आहे, परंतु, ही मशीन गेल्या अनेक दिवसापासून बंद अवस्थेत असल्यामुळे या कार्यालयातील विविध विभागाचे कर्मचारी वेळेवर उपस्थित न राहता आपल्या मर्जीप्रमाणे कार्यालयात उपस्थित राहून कामकाज करत आहेत.

तहसीलदार दत्तात्रय निलावाड, नायब तहसीलदार गिरिजाप्रसाद आवळे, विष्णू घुगे हे अधिकारी वेळेच्या आत कार्यालयात येऊन उपस्थित झाल्यानंतर या कार्यालया प्रमुखांना कार्यालय स्वच्छ करण्यासाठी विनंती करावी लागते. यासंदर्भात नागरिकांनी तक्रार केल्यास या मुजोर कामचुकार कर्मचाऱ्याकडून दमदाटीची भाषा केली जाते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या कामकाजाविषयी न बोललेच बरे अशी भूमिका याठिकाणी काम घेऊन येणाऱ्या नागरिकांची झाली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button