मुख्यमंत्री सांगली दौरा : दौऱ्यामध्ये भाजपचा गोंधळ; पोलिसांचा सौम्य लाठीमार | पुढारी

मुख्यमंत्री सांगली दौरा : दौऱ्यामध्ये भाजपचा गोंधळ; पोलिसांचा सौम्य लाठीमार

सांगली; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री सांगली दौरा : सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुराच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगलीत आहेत. मुख्यमंत्री ठाकरे हे सांगली शहरात आल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला.

मुख्यमंत्र्यांनी निवेदन स्वीकारले नाही, असे म्हणून भाजपच्या काही कार्यकर्ते निवेदन फाडून घोषणाबाजी केली. यावेळी भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तणावाचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. निदर्शने करून घोषणाबाजी केल्याने भाजपच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तुम्ही अजिबात काळजी करू नका

सांगली येथे महापुरामुळे चार लाख नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. सांगली येथील पूरग्रस्‍त भागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पाहणी केली. या वेळी पूरग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलासा दिला. ते म्हणाले, ‘तुम्ही अजिबात काळजी करू नका, यातून नक्की मार्ग काढला जाईल.’

येथे पूर आल्याने लोकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. भिलवडी येथील बाजारपेठेत ठाकरेंनी पूरग्रस्त ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला.

उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले, आधीचं कोरोनामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अतिवृष्टीचा अंदाज आला त्याचं क्षणापासून प्रशासनाने काम सुरू केले. सांगलीतील ४ लाख लोकांचे स्थलांतर केले.

जीवितहानी होऊ नये म्हणून प्रयत्न केला. मला विश्वजित कदम यांनी पूर कुठेपर्यंत वाढला होता, ते दाखवले.

लोकांचे आर्थिक आणि शेतीचे नुकसान झाले आहे. मी तळिये, चिपळूण, कोल्हापूर याठिकाणी पूरग्रस्त भागाचा दौरा केला आहे, नुकसान पाहिले आहे. तुमच्या सर्वांच्या साथीने मी मार्ग काढणार आहे.

किती नुकसान झाले आहे. त्याचे सगळी आकडेवारी मिळते आहे. शेती, घरे दारे एकूणच किती नुकसान झाले, याचा अंदाज घेणे सुरू आहे. काही ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल. कटू निर्णय घ्यावे लागतील. आपली त्याला तयारी हवी.

हे ही वाचलं का?

Back to top button