

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर येथील मेहंदी आर्टिस्ट सोनाली यांच्या खडाखड इंग्रजीची जॅकलीन फर्नांडिस, प्रियांका चोप्राला देखील भूरळ पडलीय. मेहंदी आर्टिस्ट सोनाली वाघारिया या अस्खलित इंग्रजी बोलतात. त्यांच्या व्हिडिओने अनेकांना भूरळ घातली आहे.
अधिक वाचा –
डोक्यावर पदर घेत इंग्रजी बोलणार्या सोनाली यांच्या व्हिडीओला दाद मिळत आहे.
अधिक वाचा –
गरिबीमुळे त्यांना जेमतेच सातवीपर्यंत शिक्षण घेता आले. मुंबईतील सांताक्रूझ येथे सोनाली यांनी जुहू परिसरात परेदशी पर्यटकांच्या हातावर मेहंदी काढण्याचे काम केले. त्यांच्या सहवासामुळे त्यांनी इंग्रजी भाषा परदेशी नागरिकांच्या पद्धतीने बोलण्याची कला अवगत केली.
एके दिवशी इंग्रजी बोलण्याचा व्हिडिओ त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्याची दखल अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांनी घेतली. 'स्ट्राँग वुमन' म्हणून त्यांनी व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला.
अधिक वाचा –
अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस यांनी त्यांना मुंबईला येऊन रिल्स बनविण्याचे व मेहंदी काढण्याचे आमंत्रण दिले आहे.
यू-ट्यूब व इन्स्टाग्राम पाहून रिल्स बनवायला शिकले. सोशल मीडियावर बनविलेल्या व्हिडीओचे बॉलीवूड अभिनेत्रींनी कौतुक केले, हे पाहून पहिल्यांदा शॉक बसला. मला मोठी मेहंदी आर्टिस्ट व्हायचे आहे. आगामी काळात महिला, मुलींसाठी चांगले व्हिडिओ बनविण्याचा मानस आहे.
– सोनाली वाघारिया, मेहंदी आर्टिस्ट
हे ही वाचलंत का? –