पलूस : सूर्यगाव येथील तरुण कृष्णा नदीत बुडाला | पुढारी

पलूस : सूर्यगाव येथील तरुण कृष्णा नदीत बुडाला

पलूस; पुढारी वृत्तसेवा : सूर्यगाव येथील सागर महादेव सूर्यवंशी (वय 36) हा तरुण कृष्णा नदीत पोहताना दम लागून बुडाला. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.

प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीनुसार सूर्यवंशी हा सूर्यगावच्या पाणवठ्यावरून बुर्लीच्या बाजूला पैलतीरावर पोहत आला. मात्र, पैलतीर वीस तीस फूट अंतरावर राहिला असतानाच दम लागून तो बुडू लागला. ही बाब पाणवठ्यावरून जाणारे जयकर रणनवरे, रोहन सूर्यवंशी, प्रथमेश सूर्यवंशी, श्रेयश सूर्यवंशी, संकेत सुतार, ओम रकटे यांच्या लक्षात आली. त्यांनी तरूणांला वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र बुर्लीच्या पैलतीरावर पोहोचेपर्यंत सागर बुडाला होता. त्यानंतर आमणापूर ग्रामपंचायतीच्या बोटीसह भारती रेस्क्यू टीमचे गजानन नरळे यांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बुडालेल्या तरुणाची शोधमोहीम सुरू केली. ही शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

Back to top button