

भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन 'कायचं प्रेम' असे कॅप्शन देऊन एक फोटो पोस्ट केला होता. या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली. पण, जडेजासाठी एक खास प्रतिक्रिया थेट पाकिस्तानातून आली.
रविंद्र जडेजा जसा आपल्या अष्टपैलू खेळासाठी, घोड्यासारख्या तगड्या फिटनेससाठी ओळखला जातो. त्यातप्रमाणे तो तलवारबाजी आणि आपल्या घोड्यांच्या प्रेमाबद्दलही ओळखला जातो. तो कायम अर्धशतकानंतर आपल्या बॅटने आपल्या तलवारबाजीचे कौशल्य दाखवत असतो.
जडेजा सध्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. याचदरम्यान मोकळ्या वेळात त्याने घोड्यांच्या तबेल्याला भेट दिली.
तेथील एका ऐटदार घोड्याचा फोटो त्याने आपल्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीला लावली होती. याचबरोबर त्याने हा फोटो ट्विटरवरही शेअर केला होता.
या फोटोला त्याने फॉरेव्हर लव्ह ( कायमचं प्रेम ) असे कॅप्शन दिले होते. तसेच घोड्याचे आणि हार्टचे इमोजीही वापरले होते. रविंद्र जडेजा याने शेअर केलेल्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली. पण, या प्रतिक्रियेतील एका खास प्रतिक्रियेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
ती पाकिस्तानवरुन आलेली पोस्ट 'इंग्लंड विरुद्धच्या मालिकेसाठी शुभेच्छा. पाकिस्तानातून प्रेम.' अशी होती.
दुसऱ्या एका युजरने रविंद्र जडेदाला आतापर्यंतची सर्वात ग्रेट बकरी घोषित केले. त्याने जडेजाने शेअर केलेल्या फोटोवर घोड्यासोबत बकरी असा उल्लेख केला.
भारत आणि इंग्लंड याच्यात ४ ऑगस्टपासून पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु होत आहे. या मालिकेत रविंद्र जडेजा हा महत्वाचा खेळाडू ठरणार आहे. त्याची फिरकी गोलंदाजी आणि उपयुक्त फलंदाजी भारतासाठी महत्वाची असणार आहे.
या मालिकेत इंग्लंडचा संघ भारतातील कसोटी मालिकेतील पराभवाचे उट्टे काढण्याच्या इराद्याने मौदानात उतरणार आहे.
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ : कोरोनामुळे अडचणीत आलेल्या मुंबईच्या मुर्तीकारांच्या व्यथा