सांगली : उसाचे वाडे 10 रुपयांना तीन पेंढ्या | पुढारी

सांगली : उसाचे वाडे 10 रुपयांना तीन पेंढ्या

सांगली : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात प्रचंड चारा टंचाई निर्माण झाली आहे. आसपास चारा मिळत नसल्याचे चित्र आहे. बाहेरून विक्रीसाठी येणार्‍या ऊस वाड्याच्या तीन पेंढ्यांना दहा रुपये मोजावे लागत आहेत. तर कडबा पेंढीचा दर प्रति 20 रुपयांवर गेला आहे. दावणीला बांधलेल्या पशुधनाच्या पोटासाठी पशुपालकांना पायपीट करावी लागत आहे. तरीही पुरेसा चारा मिळेना झाल्याने याचा परिणाम दुधाळ जनावरांवर होत आहे. दूध उत्पादनात घट होऊ लागली आहे. जनावरे कशी जगवायची, असा प्रश्‍नही पशुपालकांना पडला आहे.

जत, आटपाडी, कवठेमहांकाळ आदी तालुक्यांत अनेक शेतकर्‍यांनी रब्बी ज्वारीचा कडबा गंजी लावून ठेवल्या आहेत. शिल्लक वैरण महिनाभर पुरेल असे शेतकरी सांगतात. आता वाळवा, शिराळा तालुक्यांतील ऊस तोडणी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे चारा टंचाई जाणवू लागली आहे. महिन्याभरापासून डोंगरांना आग लागून शेकडो एकर गवत जळून खाक झाले आहे. त्यामुळे चारा टंचाई निर्माण झाली आहे. आडसाली उसाचा पाला अद्याप काढणीला आला नाही. काही तालुक्यांत सध्या 1200 ते 1500 रुपये प्रतिशेकडा तर काही तालुक्यांत 1500 ते 2000 रुपये प्रतिशेकडा अशा दराने पशुपालक कडबा विकत घेत असल्याचे चित्र आहे. पलूस, कडेगाव, खानापूर तालुक्यांतील काही भागात अद्याप ऊस तोडणी सुरू आहे.

सांगली : सांगलीला कधी लागणार संशोधन केंद्राची ‘हळद’

या गावातून या भागासह अन्य तालुक्यांत जादा दराने चार्‍याची विक्री केली जात आहे. थोड्या फार शेतकर्‍यांनी चार्‍यासाठी मका, कडवळ, हत्तीघास यांची लागवड केली आहे. हा चारा उपलब्ध होण्यासाठी किमान पंधरा दिवस ते महिना लागणार आहे. मार्च महिन्यातच चारा टंचाई जाणवू लागल्याने पुढील तीन महिने काय घालायचे, असा प्रश्‍न आहे. चारा उपलब्ध नसल्याने काही पशुपालक जनावरांची विक्री करत आहेत.

हेही वाचलत का ?

Back to top button