सांगली : कस्तुरी क्लबतर्फे ‘प्रीमिक्स ग्रेव्ही वर्कशॉप’ | पुढारी

सांगली : कस्तुरी क्लबतर्फे ‘प्रीमिक्स ग्रेव्ही वर्कशॉप’

सांगली : पुढारी वृत्तसेवा
पुढारी प्रस्तुत कस्तुरी क्लबतर्फे रविवारी ( दि. 27 फेब्रुवारी) ‘प्रीमिक्स आणि ग्रेव्ही वर्कशॉप’ चे सांगलीत आयोजन करण्यात आले आहे.
रोज रोज त्याच त्याच भाज्या खाऊन आलेला कंटाळा घालविण्यासाठी या ‘चला शिकू चटपटीत ग्रेव्ही आणि इन्स्टंट प्रीमिक्स’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत कोणतेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता प्रिमिक्स् बनवण्याची कला, कमीत कमी चार महिने फ्रीजमध्ये टिकवण क्षमता राहील, अशी बनविण्याची पद्धती शिकवण्यात येणार आहे.

तसेच खपीींरपीं ॠीर्रीूं च्या मदतीने अगदी दहा मिनिटांत आपण जेवण बनवू शकता. तेही घरातील व्यक्‍तींच्या आवडीनुसार बनविण्याच्या पद्धती यात शिकविण्यात येणार आहेत. केतकी सरनाईक यांचे यासाठी कार्यशाळेत मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यशाळेत काय शिकाल : व्हाईट ग्रेव्ही, मेथी मटर मलाई, रेड ग्रेव्ही, पनीर बटरमसाला, गोल्डन ग्रेव्ही, व्हेज जयपुरी, ग्रीन ग्रेव्ही, पालक पनीर, ऑरेंज ग्रेव्ही, पनीर मसाला, बिर्याणी मिक्स, व्हेज बिर्याणी, नान/कुलचा, ढोकळा प्रीमिक्स, शेवया प्रीमिक्स, इडली प्रिमिक्स तसेच प्रीमिक्स पावडर बनवून जवळपास पंचवीस प्रकारच्या भाज्या बनविण्याच्या पद्धती शिकविण्यात येतील.

यासाठी कस्तुरी सभासदांसाठी 250 रुपयांची व अन्य महिलांसाठी 400 रुपयांची प्रवेश फी आहे. राजपूत क्लासेस हॉल, रिलायन्स मॉल समोर, गुलमोहर कॉलनी, सांगली येथे रविवार 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वाजता हे वर्कशॉप होणार आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : 9607957576

Back to top button