तासगाव : द्राक्ष बागायतदारांना दलालांचा 30 लाखांचा गंडा | पुढारी

तासगाव : द्राक्ष बागायतदारांना दलालांचा 30 लाखांचा गंडा

तासगाव : पुढारी वृत्तसेवा
चिंचणी (ता. तासगाव) येथील द्राक्ष बागायतदार शेतकर्‍यांना पुणे व दिल्लीच्या दलालांनी 30 लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. द्राक्षे उधारीवर खरेदी करून पैसे न देताच पळून जाणार्‍या दलाल व कामगारांना शेतकर्‍यांनी पाठलाग करून पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार बुधवारी सकाळी झाला.

या प्रकरणी विशाल रामचंद्र पाटील, आतिष धिंग्रा, मनीषकुमार, हरीश वर्मा व मनोज या पुणे व दिल्ली येथील द्राक्ष दलाल व कामगारांना शेतकर्‍यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यापैकी चौघांना शेतकर्‍यांनी पाठलाग करून पकडले, तर एकाला आनेवाडी टोलनाक्यावर (तासगाव) पकडण्यात आले. एकजण त्या टोल नाक्यावरून पळून गेला. बागायतदार शेतकरी यांच्याकडून मिळालेली माहिती अशी : संशयित दलाल हे येथील एका लॉजवर राहिले होते. ते शेतकर्‍यांची द्राक्षे खरेदी करीत होते. खरेदी केलेल्या द्राक्षाचे पैसे देण्यास गेल्या आठ दिवसापासून ते चालढकल करीत होते.

‘ते’ दुर्मीळ वन्यजीव घेणार मोकळा श्वास ; नैसर्गिक अधिवासात सोडण्यास न्यायालयाची परवानगी

बुधवारी सकाळी या दलालांचा शेतकर्‍यांना संशय आला. शेतकरी संबधित लॉजवर जाऊन खातरजमा करीत होते. त्यावेळी त्यांचा संशय बळावला. शेतकर्‍यांनी लॉज मालकास या दलालांनी दिलेल्या आधारकार्डांची तपासणी (तासगाव) केली. तेव्हा ती आधारकार्डे बोगस असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

हे ही वाचलत का ?

Back to top button