Water Supply Disruption Khalapur: कंपनीच्या हलगर्जीपणाने पाणीपुरवठा ठप्प!; नावंढे, घोडीवली, शिवगाव ग्रामस्थ आक्रमक

नावंढे, घोडीवली व शिवगावचे ग्रामस्थ आक्रमक; गोदरेज कंपनी व महावितरणविरोधात संताप
Water Supply Disruption Khalapur
Water Supply Disruption KhalapurPudhari
Published on
Updated on

खोपोली : खालापूर तालुक्यातील नावंढे ग्रामपंचायत हद्दीतील नावंढे गावाजवळ गोदरेज वूड कंपनीने 101 एकर जमीन खरेदी केली आहे. याठिकाणी प्लाँटींगच्या माध्यमातुन बंगले बांधण्यात येणार असताना याठिकाणी स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी नेहमीच कंपनी प्रशासन व स्थानिकांमध्ये संघर्ष झाला असता स्थानिकांनी कंपनी व्यवस्थापनाच्या कारभाराबाबत नाराजी असताना पुन्हा एकदा नावंढे ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून कंपनी व्यवस्थापनाच्या मनमानी कारभारामुळे गेल्या दोन दिवसापासून ग्रामपंचायतीतील गावांचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे.

Water Supply Disruption Khalapur
ISRO Visit Opportunity: राजिप शाळेच्या विद्यार्थ्यांना इस्रो भेटीची सुवर्णसंधी

कंपनी व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे समजताच ग्रामस्थांनी गोदरेज कंपनीच्या आवारात ज्याठिकाणी विद्युत पुरवठा करणारी लाईन तुटली आहे, त्याठिकाणी जावून कंपनी व्यवस्थापनाला व महावितरण प्रशासनाला धारेवर धरत त्वरित विद्युत पुरवठा सुरळीत करून पाणीपुरवठा पूर्ववत व्हावा यासाठी मागणी केली. मात्र गोदरेज कंपनीच्या मनमानी कारभारामुळे दोन दिवस पाणी न आल्याने सर्वत्र ठिकाणी संताप व्यक्त केला जात आहे.

Water Supply Disruption Khalapur
Poladpur Rural Tourism Development: ग्रामीण पर्यटन योजनेतून पोलादपूरचा विकास शक्य

नावंढे गावाजवळ गोदरेज वूड कंपनीचे नव्याने काम सुरू होताच या ठिकाणी स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून अनेक वेळा ग्रामस्थांनी आंदोलन करत रोजगार मिळावे यासाठी प्रयत्न केले असता यावेळी गोदरेज कंपनी प्रशासन व स्थानिकांमध्ये संघर्ष ही पाहायला मिळाला. त्यामुळे येथील बहुसंख्य ग्रामस्थ गोदरेज कंपनीच्या प्रशासना विरोधात नाराजी व्यक्त करत असताना पुन्हा एकदा येथील ग्रामस्थ कंपनीच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करीत असून कंपनीच्या हलगर्जीपणामुळे गावात दोन दिवस पाणीपुरवठा न झाल्याने ग्रामस्थ 10 जानेवारीला आक्रमक झाले होते.

Water Supply Disruption Khalapur
Tamhini Ghat Dead Body: ताम्हिणी घाटात अनोळखी तरुणाचा मृतदेह

गोदरेज वूड कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणात जेसीबी पोकलेन साह्याने सपाटीकरण करत जागेची लेव्हलिंग करण्यात येत असताना कंपनीच्या कामात विद्युत पुरवठा करणारे पोल मुळे व्यत्यय येत असल्याने कंपनी प्रशासनाने महावितरण प्रशासनाला हाताशी धरत ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांना विश्वासात न घेता जवळपास दीड ते दोन किलोमीटर अंतराचे एचटी लाईनचे पोल काढून टाकत जमिनीतून लाईन टाकली असता ही लाईन जेसीबीच्या साह्याने काम सुरू असताना

Water Supply Disruption Khalapur
Mahad Accident News: चिमुकलीच्या अपघाती मृत्यूने सव गाव हादरले; संतप्त ग्रामस्थांचा पोलिस ठाण्यावर घेराव

तुटल्याने गेल्या दोन दिवसापासून घोडीवली गाव, नावंढे, शिवगाव पाणीपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. जेसीबीच्या साह्याने काम करत असताना जमिनीतून न्हेत असताना लाईन गोदरेज कंपनीच्या आवारात तुटली ही बाब ग्रामस्थांना समजतात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत महावितरण प्रशासन व कंपनी प्रशासनाला जाब विचारला. महावितरणने गावाचा पाणीपुरवठा व विद्युत पुरवठा करणारे पोल कंपनीच्या हितासाठी का काढून टाकले असा सवाल उपस्थित केला आहे.

Water Supply Disruption Khalapur
Naru disease: महाड–खाडीपट्ट्यातील दुबार पिकांवर ‘नारू’ रोगाचे संकट

कायद्याने जेव्हा एचटी लाईन अंडरग्राउंड टाकली जाते, तेव्हा ती चार फूट खोल व दोन लाईन टाकल्या जातात. कारण जेव्हा एक लाईन खराब झाली तर दुसऱ्या लाईनचा वापर करू शकतो, त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होऊ शकत नाही. मात्र या ठिकाणी कंपनीचे पैसे वाचवण्यासाठी व काम झटपट व्हावे यासाठी एक लाईन टाकल्याने याचा नाहक त्रास आम्हा ग्रामस्थांना सहन करावा लागला असून दोन दिवस पाणीपुरवठा गावात होऊ शकला नाही. त्यामुळे महावितरणच्या कारभारासह कंपनी व्यवस्थापनाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत आहोत.

जगन्नाथ हाडप, नावंढे ग्रामस्थ

Water Supply Disruption Khalapur
Pachal Talwade Bridge: पाचल-तळवडे पुलाबाबत नुसत्या घोषणाच

नावंढे गावचे हद्दीमध्ये गोदरेज कंपनीचा रेसिडेनशियल प्रोजेक्ट डेव्हलप करत आहे. सदर ठिकाणी महावितरण कंपनीची ओव्हर्‌‍हेड एचटी लाईन अडथळा येत असल्यामुळे सदरची लाईन महावितरणच्या नियमानुसार गोदरेज कंपनीने अंडरग्राउंड करण्याचे काम सुरु आहे.

प्रवीण शेडगे, सहाय्यक अभियंता खालापूर शाखा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news