ISRO Visit Opportunity: राजिप शाळेच्या विद्यार्थ्यांना इस्रो भेटीची सुवर्णसंधी

6 वी ते 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी 13 जानेवारीला विज्ञान परीक्षा; 45 गुणवंत विद्यार्थ्यांची निवड
ISRO Satellite
ISRO Satellitex
Published on
Updated on

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग प्राथमिक यांच्यातर्फे राष्ट्रीय अविष्कार अभियान सन 2025-2026 राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनला (इस्रो) भेट देता येणार आहे. यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये मंगळवारी (ता. 13) विज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या एकूण 45 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे या संधीचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे.

ISRO Satellite
Poladpur Rural Tourism Development: ग्रामीण पर्यटन योजनेतून पोलादपूरचा विकास शक्य

शिक्षण विभाग प्राथमिक यांच्यातर्फे राष्ट्रीय अविष्कार अभियान सन 2025-2026 राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत निवडक विद्यार्थ्यांना राज्यांतर्गत व राज्याबाहेरील अभ्यास भेट हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमधील इयत्ता 6 वी ते 8 वीच्या विज्ञान विषयातील गुणवंत विद्यार्थ्यांना राज्यांतर्गत व राज्याबाहेरील अभ्यास भेटीकरीता जाण्याची संधी प्राप्त होणार आहे.

ISRO Satellite
Tamhini Ghat Dead Body: ताम्हिणी घाटात अनोळखी तरुणाचा मृतदेह

राज्यांतर्गत भेटीसाठी पुणे येथील आयआयएसईआर, आयुका, एनआयव्ही, एनसीएल, आयआयटएम तर राज्याबाहेर बंगळुरुस्थित इस्रोला भेट देण्यात येणार आहे. या भेटींसाठी गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार असून याकरिता मंगळवारी (ता.13) शाळांमध्ये विज्ञान परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.

ISRO Satellite
Shrivardhan Municipal Election: श्रीवर्धन उपनगराध्यक्षपदाची आज होणार निवड

एकूण 45 विद्यार्थ्यांची होणार निवड

जिल्हास्तरावर निवड झालेल्या प्रथम तीन मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा शाळांमधील प्रत्येकी 6 असे 18 विद्यार्थी निवडले जातील. तसेच उर्वरित शाळांमधील 27 विद्यार्थी अशा एकूण 45 विद्यार्थ्यांची अभ्यास भेटीकरिता निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या परीक्षेत आवर्जुन सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news