

पोलादपूर :समीर बुटाला
कोकण ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून महाड व पोलादपूर तालुक्यातील पाच गावांचा कायापालट 2017 मध्ये करण्यात आला असला तरी त्या दृष्टीने पर्यटकांची रेलचेल होऊ शकली नाही. जिल्ह्याचा विकास आराखड्यात पोलादपूर तालुक्यातील पर्यटन सह इतर विकासात्मक कामाचा समावेश अनिवार्य बनले असून त्यावर शासनाने सकारात्मक दृष्टिकोन राखत उपाययोजना राबविणे गरजेचे बनले आहे . आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दरम्यान तालुक्यातील महत्वपूर्ण विकास कामांना प्राधान्य देणे गरजेचे बनले आहे. पर्यटन सह तालुक्यातील आरोग्य व्यवस्था बळकटीकरण , रोजगार निर्मिती सह शैक्षणिक घोरण वर सकारात्मक विचार होणे गरजेचे बनले आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधी इतर राज्यातील पर्यटन धोरण चा सखोल अभ्यास करत ग्रामीण भागातील अस्सल कला वास्तू चे वास्तव पर्यटन च्या माध्यमातून दाखविले गेल्यास पर्यटकांना पर्यटनाचा अनोखा अविष्कार पाहवयास मिळेल मात्र त्यासाठी स्थानिक पातळीवर ऐतिहासिक घटना स्थळ याची माहिती ग्रामीण कोकण च्या मद्यमातून पुढे आणणे गरजेचे बनले आहे लाखो रुपये खर्चून गावामध्ये पदपाथ, वसतिगृह, स्वच्छतागृह आदींची कामे करण्यात आली असली तरी महाड व पोलादपूर तालुक्यातील ऐतिहासिक खुणा असलेल्या गावांतील वास्तूंची नूतनीकरण केल्यास पर्यटनामध्ये वाढ होऊन तालुक्याचा सर्वांगीण विकास साध्य करता येणार आहे.कोकण ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून विविध गावांमध्ये विकासकामे करण्यात आले असले तरी हवी तसे पर्यटन वाढले नाही किंबहूना त्या कडे प्राधान्याने लक्ष न दिल्याने अनेक विकास कामे तोकडे पडल्याचे दिसून आले आहेत
पोलादपूर तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण असलेले कुडपण गावामध्ये फुथपाथ, पथदिवे आदींची कामे करण्यात आली असली तरी गावात इतर बाबीची पूर्तता नसल्याने अनेक पर्यटक या ठिकाण कडे वळत नसल्याचे पाहवयास मिळत आहे या भागात दळणवळण सह पर्यटक यावे यासाठी लागणाऱ्या विकासात्मक कामाची पूर्तता केल्यास गावांमध्ये भविष्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची रेलचेल होणार आहे.
गावाच्या विकाससह दळणवळण सुविधेला वेग येणार आहे. मात्र गेल्या काही वर्षांत या ठिकाणी पर्यटन साठी योग्य ती राहण्याची सोय नसल्याने तसेच जेवणाची व इतर सोइ सुविधा नसल्याने अनेक जण या ठिकाणी येण्यास धजावत नाहीत या ठिकाणी शासनाच्या पर्यटन विभागाने शेलार मामा समाधी स्थळ चे व घराचे वास्तू चे जतन करणे गरजेचे आहे त्याच प्रमाणे त्याच्या शस्त्र चे दालन उभे करणे गरजेचे बनले आहे या गावाप्रमाणे पोलादपूर तालुक्यातील लहूळसे, कोंढवी किल्ला आदींचा विकास केल्यास तालुक्यातील पर्यटन मध्ये वाढ होऊन स्थानिकांना रोजगार प्राप्त होईल.
या पर्यटन स्थळ सह सावित्री नदीचे धरण आणि नदी पत्राचा विकासः मध्ये नदीच्या प्रवाही भागात रिव्हर राफ्टींग यासारखे साहसी खेळ व संथ भागात वॉटर पार्कच्या विकासासाठी नदीकाठचा वापर करता आला तर तालुक्याच्या व पर्यायाने राज्याच्या तिजोरीत आर्थिक भर पडेल.
सह्याद्री पर्वत रांगांमधील एक प्रख्यात थंड हवेचे ठिकाण म्हणून कुडपण गाव गेले काही वर्षात नावारूपास आले आहे. भीमाची काठी, सुमारे 1600 फुट खोल कोसळणारा धबधबा, विविध विविंग व इको पोईट अश्या एक ना अनेक आकर्षाणांनी समृद्ध अश्या कुडपण चा सर्वांगीण विकास हि पोलादपूर तालुक्याच्या पर्यटन केंद्र होण्यामागे मैलाचा दगड ठरू शकतो. कुडपणच्या आल्हाददायक हवामानामुळे आणि असंख्य आकर्षणांमुळे एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून कुडपणच्या संभाव्यतेचा लाभ घेण्यासाठी, चालण्याची ठिकाणे, पाहण्यासाठी गॅलरी, साहसी क्रीडा (ॲडवेंचर स्पोर्ट्स) सुविधा आणि विश्रामगृहांसारर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधीची तरतूद झाली तर तालुक्यात सुमारे 2500 हून अधिक लोकांचा रोजगार प्राप्त होय शकतो महाबळेश्वर माथेरानच्या धरतीवर कुडपण या स्थळाचा विकास केल्यास एक जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ विकसित होईल