Bengaluru Triple Murder : AI कडून प्लॅनिंग! तिहेरी हत्याकांडात Gemini चा धक्कादायक वापर; पोलिसही चक्रावले

बंगळूर पोलिसांचे Gemini चॅट हिस्ट्री मागवण्यासाठी Google ला पत्र
Bengaluru Triple Murder
बंगळूर तिहेरी हत्‍यांकाडातील आरोपी केनेथ आणि त्याची लिव्ह-इन पार्टनर, सहआरोपी श्वेता. File Photo
Published on
Updated on

Bengaluru Triple Murder : बंगळुरूमधील तिहेरी हत्याकांडाने केवळ क्रूर गुन्ह्यामुळेच नव्हे, तर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) च्या कथित वापरामुळेही खळबळ उडवली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी केनेथ (२५) याने हत्या घडवून आणण्यापूर्वी तब्बल सहा महिने Google च्या Gemini या AI चॅटबॉटचा वापर करून नियोजन केल्याचा दावा बंगळुरू पोलिसांनी केला आहे. त्यामुळे AI चा इतक्या मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचा हा शहरातील पहिलाच खूनाचा तपास असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

लिव्ह-इन पार्टनरच्‍या मदतीने केली होती आईवडिलांसह बहिणीची हत्‍या

पोलिसांच्या माहितीनुसार, २२ जून रोजी बंगळुरूतील केआर पुरम परिसरात केनेथने त्याची लिव्ह-इन पार्टनर श्वेताच्या आई-वडिलांसह धाकट्या बहिणीची हत्या केली. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, श्वेतानेही या गुन्ह्यात केनेथला मदत केल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

Bengaluru Triple Murder
Shocking Thane Crime News: साडी दिली नाही म्हणून पत्नीनं पतीच्या डोक्यात घातला कुकर... त्यानंतर गळा आवळून केलं खल्लास

थेट प्रश्न टाळून AI कडून मिळवली माहिती

तपासात असे समोर आले की, केनेथने Gemini ला "हत्या कशी करावी?" किंवा "मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी?" असे थेट प्रश्न विचारले नाहीत. त्याऐवजी, "अशी परिस्थिती निर्माण झाली तर काय करावे?", "घरात चोर घुसले तर त्यांच्यावर कसा हल्ला करावा?" अशा काल्पनिक स्वरूपातील प्रश्न विचारून आवश्यक माहिती मिळवली.पोलिसांच्या मते, संशोधन आणि नियोजनासाठी त्याने केवळ Google Gemini चाच वापर केला.

Bengaluru Triple Murder
Crime News: इंजिनिअर तरुणीचे धक्कादायक कृत्य; निर्वस्त्र मंदिरात गेली अन् देवीची मूर्ती घेऊन तलावात उडी मारली, कारण काय?

मृतदेह जाळण्याचाही होता कट

तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, केनेथने आपल्या प्रस्तावित क्लाउड किचन व्यवसायासाठी लोखंडी भट्टी तयार केली होती. सुरुवातीला मृतदेह त्यामध्ये जाळून पुरावे नष्ट करण्याचा त्याचा विचार होता. मात्र AI चॅटबॉटकडून मिळालेल्या माहितीचा आणि प्रत्यक्ष अडचणींचा विचार करून हा पर्याय व्यवहार्य नसल्याचे त्याने ठरविल्याचा पोलिसांचा दावा आहे.

५० लाखांच्या आर्थिक वादातून कट रचल्याचा संशय

पोलिसांच्या नोंदीनुसार, श्वेताने तिच्या आई-वडिलांकडून सुमारे ५० लाख रुपये उधार घेऊन केनेथच्या क्लाउड किचन व्यवसायासाठी दिले होते. मात्र व्यवसायात पैसे संपल्यानंतर श्वेताच्या पालकांनी परतफेडीचा तगादा लावण्यास सुरुवात केली. तपास अधिकाऱ्यांच्या मते, याच आर्थिक वादातून केनेथने श्वेताच्या कुटुंबाला अडथळा मानत त्यांची हत्या करण्याचा कट रचला. हा कट अधिक परिपूर्ण करण्यासाठी त्याने AI ची मदत घेतल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

Bengaluru Triple Murder
Dinosaurs News : ६.६ कोटी वर्षांपूर्वी डायनासोरचा अंत करणारा लघुग्रह कसा होता?

रक्ताचे डाग, मृतदेहाची विल्हेवाटवरही सर्च

पोलिसांच्या माहितीनुसार, केनेथने वारंवार हत्या करण्याच्या पद्धती, रक्ताचे डाग कसे हटवायचे, मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची तसेच लोखंडी भट्टीत मृतदेह जाळणे शक्य आहे का, यासंदर्भात माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.

तिहेरी हत्येनंतर रोख रक्कम व दागिने घेऊन पलायन

तपासानुसार, २२ जून रोजी केनेथने प्रथम श्वेताची आई मुथुलक्ष्मी (४८) यांना फ्लॅटमध्ये बोलावून त्यांच्यावर वार केले. त्यानंतर स्वतंत्रपणे आलेले वडील सोमसुंदर (५५) आणि धाकटी मुलगी सुप्रिया (२०) यांच्यावरही हल्ला करण्यात आला.हत्येनंतर आरोपींनी घरातील रोख रक्कम आणि चांदीचे दागिने घेऊन पुदुच्चेरीकडे पलायन केल्याचा आरोप आहे. २४ जून रोजी पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती.

सोमसुदंर यांचा मृत्यूपूर्व जबाब ठरला तपासासाठी महत्त्‍वपूर्ण

या प्रकरणात गंभीर जखमी अवस्थेतील सोमसुंदर यांनी दिलेला मृत्यूपूर्व जबाब (Dying Declaration) तपासासाठी महत्त्वाचा ठरल्याचे सांगितले जात आहे. अनेक वार झाल्यानंतरही ते जिन्यापर्यंत पोहोचल्यामुळे शेजाऱ्यांचे लक्ष गेले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

Bengaluru Triple Murder
Supreme Court : 'सेकंड क्लास पॅसेंजर' हा शब्दप्रयोगच बंद करा : सर्वोच्च न्यायालयाने रेल्वेला अशी सूचना का केली?

Gemini चॅट हिस्ट्री मागवण्यासाठी Google ला पत्र

तपास आता डिजिटल पुराव्यांपर्यंत पोहोचला असून, बंगळुरू पोलिसांनी Google कडे केनेथच्या Gemini चॅट हिस्ट्रीची मागणी केली आहे. तपासादरम्यान मिळालेल्या डिजिटल पुराव्यांची पडताळणी करण्यासाठी ही माहिती महत्त्वाची ठरणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या संभाषणांमधून गुन्ह्याच्या नियोजनात AI चॅटबॉटचा किती आणि कशा प्रकारे वापर झाला, याबाबत अधिक स्पष्टता मिळू शकते, असा तपास यंत्रणांचा विश्वास आहे.

AI ला सहआरोपी बनवण्याचाही झाला होता विचार

तपासातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने काही वृत्तांतांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, आरोपीने AI वर इतका मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहिल्यामुळे Gemini ला सहआरोपी मानण्याचाही विचार तपासादरम्यान झाला होता. मात्र पोलिसांनी AI चॅटबॉटवर कोणतीही कायदेशीर जबाबदारी निश्चित केलेली नाही. या टिप्पणीतून AI चा गुन्हेगारी नियोजनात वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारी कायदेशीर आव्हाने पुन्‍हा एकदा समोर आली आहेत.

Bengaluru Triple Murder
Aadhaar card म्हणजे प्रथमदर्शनी निवासाचा पुरावा; पूर्वसूचनेशिवाय बुलडोझर चालवणं बेकायदेशीर : हायकोर्ट

आरोपीच्‍या मानसिक स्थितीचाही तपास

तपासादरम्यान करण्यात आलेल्या मानसशास्त्रीय मूल्यमापनात केनेथ सामाजिकदृष्ट्या अत्यंत एकाकी होता. त्याचे पूर्वी ब्रेकअप झाले होते, अशी माहिती समोर आली. तसेच श्वेता आर्थिकदृष्ट्या त्याला मदत करत होती, तर तो मित्र-परिवारापासून दूर राहत असल्याचाही तपासात दावा करण्यात आला आहे.

logo
Pudhari News
pudhari.news