Shocking Thane Crime News: साडी दिली नाही म्हणून पत्नीनं पतीच्या डोक्यात घातला कुकर... त्यानंतर गळा आवळून केलं खल्लास

Shocking Thane Crime News
Shocking Thane Crime Newspudhari
Published on
Updated on

Shocking Thane Crime News: ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका ३० वर्षाच्या महिलेनं आपल्या पतीची हत्या केली आहे. तिनं साडी घेऊन देण्यावरून झालेल्या वादानंतर हे टोकाचं पाऊल उचललं. या महिलेनं वादानंतर प्रेशर कुकरच्या झाकणाने पतीला मारहाण केली. पती जखमी झाल्यानंतर त्याचा गळा आवळून जीव घेतला. याबाबतची माहिती पोलिसांनी वृत्तसंस्थेला दिली आहे.

Shocking Thane Crime News
Parli Crime News: परळीत मध्यरात्री घरफोडी; सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरातून ६ लाखांचा ऐवज लंपास

बिहारमधील कुटुंब

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनीतादेवी हरराम सिंह या मुळच्या बिहारमधील रोहतास जिल्ह्याच्या रहिवासी असणाऱ्या महिलेला मंगळवारी अटक करण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की महिलेनं पतीच्या मृत्यूला एक अपघात असं सांगितलं होतं.

पोलीस अधिकारी म्हणाले की, 'पीडित हरराम कुशनजी सिंह वय वर्ष ३५ हे १९ जुलैला बदलापूर इस्ट मधील आपल्या घरात होते. त्यावेळी साडी आणण्यावरून पती आणि पत्नी यांच्यात वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की महिलेने प्रेशर कुकरचे झाकण घेऊन पतीवर हल्ला केला. त्यानंतर त्याचा गळा आवळून त्याला खल्लास केले.'

Shocking Thane Crime News
Jalna Crime News : मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी अनिकेत जाधव जेरबंद

असा झाला खुलासा

पत्नीच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी सुरूवातीला अकस्मिक मृत्यूचे प्रकरण नोंदवलं होते. मात्र सरकारी रूग्णालयातील मेडिकल रिपोर्टनंतर तपासाची चक्रे उलट्या दिशेने फिरली. बदलापूर इस्ट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ इन्स्पेक्टर नितीन पाटील यांनी सांगितलं की, 'वैद्यकीय अहवालानुसार हरराम यांचा मृत्यू अनैसर्गिक होता. त्यांचा मृत्यू हा गळा आवळल्यामुळं झाला. त्यानंतर पोलिसांनी मृत हरराम यांच्या कुटुंबीय आणि घर मालकांशी चौकशी केली असता हरराम यांच्या पत्नीवर पोलिसांचा संशय बळावला.'

Shocking Thane Crime News
Crime News : ठाण्यात राडा करणाऱ्या नातेवाइकांनाही पोलिसांचा दणका

अधिकाऱ्यांनी सांगितलं की मंगळवारच्या एका स्थानिक न्यायालायने सुनितादेवी यांना २९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या घटनेचा उलगडा झाला त्यावेळी आसपासच्या लोकांना देखील आश्चर्याचा धक्का बसला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news