रायगड : शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बबन पाटलांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल | पुढारी

रायगड : शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बबन पाटलांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

पनवेल, पुढारी वृत्‍तसेवा : महिलांचे त्यांच्या मित्रा सोबतचे फोटो, व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल करणे हे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आणि सल्लागार बबन पाटलांना चांगलेच महाग पडले आहे. या प्रकारामुळे बबन पाटलांवर खारघर पोलीस ठाण्यात पीडित महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. बबन पाटील शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख आणि शिवसेनेचे सल्लागार आहेत. तसेच शिवसेनेचे जुने नेते आहेत . बबन पाटील यांच्यासोबत शिवसेनेचे माजी शहर प्रमुख शंकर ठाकूर यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिला ही करंजाडे वडघर येथील रहिवाशी आहे. ही महिला पतीपासून विभक्त कुटूंबात राहते, काही दिवसांपूर्वी या महिलेने मित्रासोबत काढलेले सेल्फी फोटो, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बबन पाटील यांनी 30 जानेवारी रोजी सकाळी व्हायरल केले.

तसेच, खारघर शहराचे माजी शहर प्रमुख शंकर ठाकूर यांनी देखील 29 जानेवारी देखील काही फोटो ग्रुपवर व्हायरल केले. आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांचे शहर प्रमुख यांचा प्रताप म्हणून या फोटो सोबत मेसेज टाकला. हा मेसेज आणि फोटो व्हाट्सअप ग्रुपवर व्हायरल झाल्याचे पीडित महिला यांना समजल्यानंतर, या घटनेचा जाब विचारण्यासाठी पीडित महिला शंकर ठाकूर यांच्या घरी गेल्या घरी गेल्या. नंतर शंकर ठाकूर यांनी अर्वाच्य आणि अश्लिल भाषेत शिवीगाळ करून घरात धक्काबुक्की केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.

तसेच, “तुझे तुझ्या मित्रासोबत जसे फोटो तू काढले आहे असेच फोटो माझ्या सोबत काढ”, असे बोलून माझा हात पकडून माझ्या सोबत अंगलट करण्याचा प्रयत्न देखील केल्याचा आरोप या महिलेने ठाकूर यांच्यावर पोलीस तक्रारीत केला आहे. “फोटोचे बॅनर बनवून खारघर शहरात लावण्याची धमकी दिल्याचे आरोप पीडित महिलेने केले आहेत. तसेच बबन पाटील यांनी देखील तुझे फोटो दोन दिवसांत बॅनर करून शहरात लावतो”, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. या घटनेमुळे माझी बदनामी झाल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणी बबन पाटील आणि शंकर ठाकूर यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मला बदनाम करण्याच्या प्रयत्न सुरू असून ही राजकीय खेळी आहे : बबन पाटील

माझ्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हे आज माध्यमातून समजले आहे. या तक्रारीबाबत पोलीस ठाण्यातून मला कोणताही फोन आला नाही. तसेच हे अंतर्गत राजकारण आहे. राजकीय सुडातून हा प्रकार झाला आहे. मला केवळ बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, असे पाटील म्‍हणाले.

पक्षातील वरिष्ठ या बाबत निर्णय घेतील : शिरीष घरत

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली घटना समाजमाध्यमातून समजली आहे. शिवसेना पक्ष हा महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. आणि असा प्रकार जर घडला असेल तर याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते या प्रकरणाची चौकशी करून योग्य तो निर्णय घेतील, असे शिरीष म्‍हणाले.

हे ही वाचलं का

Back to top button