Lata Mangeshkar : लतादिदींनी लग्न का केलं नाही? ‘हे’ होतं मुख्य कारण… | पुढारी

Lata Mangeshkar : लतादिदींनी लग्न का केलं नाही? 'हे' होतं मुख्य कारण...

पुढारी ऑनलाईन डेस्क : गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.  कोरोना आणि न्युमोनियाने त्याचं मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे समाजातील सर्व स्तरातून दुःख व्यक्त केलं जातं आहे. त्यांच्या निधनाने त्यांच्या आयुष्याशी निगडीत अनेक क्षण सांगितले जात आहे. त्यातीलच एक म्हणजे लतादिदींनी लग्न का केलं नाही? तेच जाणून घेऊ या…

२८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदोरमध्ये लतादिदींचा जन्म एका मराठा कुटुंबात झाला होता. त्यांना लहानपणी ‘हेमा’ नावाने हाक मारली जायची. आपल्या पाच भावंडांमध्ये लतादिदी सर्वात मोठ्या होत्या. लता मंगेशकर यांचे वडील पं. दीनानाथ मंगेशकर हे एक रंगमंच कलाकार आणि संगीतकार होते. लतादिदींना आपल्या संगीत आणि गायनाचा वारसा वडिलांकडूनच घेतला होता.

दीनानाथ मंगेशकर जोपर्यंत होते, तोपर्यंत घरामध्ये सर्व व्यवस्थित होतं. पण, लतादिदींच्या वयाच्या १३ व्या वर्षी त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी लतादिदींवर आली. लहानपणी त्यांच्यावर मोठी जबाबदारी पडली होती. घराची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्या घराबाहेर पडल्या. त्यांना मधेच शिक्षण सोडावं लागलं.

भावंडांना सांभाळण्यासाठी आणि घरातील जबाबदारी पार पाडण्यासाठी लतादिदींनी लग्न केलं नाही. त्यांना स्वतः एका मुलाखतीत हे लग्न न करण्याचं कारण सांगितलं होतं. त्या मुलाखतीत लतादिदी म्हणाल्या होत्या की, “लग्न करण्याचा खूप विचार केला होता. पण, तो प्रत्यक्ष अंमलात आला नाही. घरातील लहान भावंडांची जबाबदारी असल्यामुळे लग्न करू शकले नाही. भावंडांना संभाळत असताना वेळ कधी निघून गेला हे कळलेच नाही”, असंही त्यांनी सांगितलं होतं.

Back to top button