जळगाव : विवाहितेचा गळा आवळून खून केल्याने पतीसह चौघांवर गुन्हा दाखल

जळगाव : विवाहितेचा गळा आवळून खून केल्याने पतीसह चौघांवर गुन्हा दाखल
Published on
Updated on

जळगाव प्रतिनिधी : पाचोरा तालुक्यातील विष्णूनगर (गाळण) येथील २४ वर्षीय विवाहितेच्या मृत्यू मागील कारणाचा उलगडा शवविच्छेदनानंतर झाला असून विवाहितेचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पतीसह चार जणांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन जणांना अटक केली आहे.

पाचोरा तालुका विष्णू नगर (गाळण) मनिषा चेतन राठोड (वय-२४) सासर तर कुंडाणे तांडा ता. धुळे येथील माहेर असलेल्या विवाहिता मनिषा हिचा ४ फेब्रुवारी रात्री खाटेवरच गळा आवळून खून करण्यात आला होता. मात्र सासरच्या मंडळींनी तिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची बतावणी केल्याने पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र मनिषा हिच्या गळ्यावर दोरी आवळ्याच्या व नखे लागल्याच्या खुना आढळून आल्याने तिचा भाऊ ज्ञानेश्वर जग्गनाथ पवार याने मनिषा हिचे शवविच्छेदन पाचोरा येथे न करता इनकॅमेरा जळगाव येथे करण्याची मागणी केल्याने शनिवारी दुपारी १ वाजेच्या दरम्यान जळगाव जिल्हा रुग्णालयाचे डॉ. सोनार यांनी इनकॅमेरा शवविच्छेदन करुन पाचोरा पोलिसांना अहवाल सादर केला.

या अवहालात मनिषा राठोड हिचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेला नसून तो दोरीने गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाल्याने ज्ञानेश्वर पवार यांनी चेतन दलेरसिंग राठोड (पती), सयाबाई जयसिंग राठोड (जेठानी), जयसिंग दलेरसिंग राठोड (जेठ), भगवान दलेरसिंग राठोड (दिर) यांच्या विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला.

मनिषा राठोड हिचा विवाह गेल्या दोन वर्षांपूर्वी झाला होता. विवाह झाल्यानंतर दोन महिन्यांपासूनच विवाहात कमी हुंडा दिला व संसार उपयोगी भांडे दिले नाही. यावरुन तिला पतीसह सासरची मंडळी सतत त्रास देत असत. मनिषा हिचा पती चेतन याचे त्याची मोठी वहिनी सयाबाई जयसिंग राठोड हिच्याशी अनैतिक संबंध होते. ही बाब मनिषा हिने प्रत्यक्ष पाहुन पतीस विचारणा केल्याने त्याचा राग येवून पती चेतन दलेरसिंग राठोड, जेठानी सयाबाई जयसिंग राठोड, जेठ जयसिंग राठोड, दिर भगवान राठोड यांनी मनिषा हिचा कायमचा काटा काढला. मनिषा हिस पती चेतन पासून ९ महिन्याचा यश नावाचा मुलगा असून त्यास चेतन याच्याकडे सोपविण्यात आले आहे. मनिषा हिच्या कुंडाणे तांडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे हे करीत असून खुनातील चेतन राठोड (पती), जयसिंग राठोड (जेठ) व भगवान राठोड (दिर) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा :

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज… नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. ? पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news