औरंगाबाद : लता मंगेशकर यांच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगचे ते पाच तास… | पुढारी

औरंगाबाद : लता मंगेशकर यांच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगचे ते पाच तास...

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : छंद विठ्ठलाचा मना माझ्या…. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी लता दीदींची पहिली भेट झाली. त्या पाच तासांच्या रेकॉर्डिंगच्या वेळेत लता दीदींसोबत गातांना साक्षात सरस्वती आपल्यासोबत असल्याचा अनुभव मला आला, अशी लता दिदींसोबतची आठवण गायक, संगीतकार राजेश सरकटे यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.

यावेळी ते म्हणाले, 2006 मध्ये श्री कृष्ण जन्माष्ठमीच्या दिवशी मुंबई येथील स्वरलता स्टुडिओत गाण्याचे रेकॉर्डिंग होते. उषा मंगेशकर यांच्या मदतीने लता दिदींसोबत गाण्याची सुवर्णसंधी मला मिळाली. दिदी स्टुडिओत आल्या तेव्हा त्यांनी जन्माष्टमीचा प्रसाद सोबत आणला होता. तो आम्हा सर्वांना दिला.

गाण्याची रेकॉर्डिंग पाच तास चालली. त्यानंतर माझ्या गाण्यातील शब्द, ताल, संगीत सर्वच सुरेख होते, असे माझ्या कौतुकाचे बोल दिदींकडून मला ऐकायला मिळाले ते मला अमृततुल्य होते. केवळ गाण्याबद्दलच चर्चा न करता त्यांनी माझ्या कुटूंबाविषयीही विचारणा केली. आई- बाबाविषयक विचारपूस केली. 2006 ते 2007 दरम्यान लता दिदी औरंगाबादला येणार होत्या. मात्र काही कारणास्तव ते त्यांना शक्य झाले नाही, असा अनुभव राजेश सरकटे यांनी सांगितला.

हेही वाचा

Back to top button