Suresh Raina : क्रिकेटर सुरेश रैनाच्या वडिलांचे निधन | पुढारी

Suresh Raina : क्रिकेटर सुरेश रैनाच्या वडिलांचे निधन

लखनऊ (उत्‍तर प्रदेश) ; पुढारी ऑनलाईन 

क्रिकेटर सुरेश रैनाचे वडील त्रिलोकचंद रैना यांचे आज (रविवार) निधन झाले. दीर्घकाळ कर्करोगाने ग्रस्त असलेल्या त्रिलोक चंद रैना यांची प्रकृती डिसेंबरपासूनच खालावली होती. सुरेश रैना गाझियाबादमधील त्यांच्या राहत्या घरी वडिलांच्या सेवेत होते.

आजारी काश्मिरी पंडीत त्रिलोक चंद रैना यांनी रविवारी गाझियाबादमधील राजनगर येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने क्रिकेट जगतातून दु:ख व्यक्‍त करण्यात येत आहे. त्रिलोकचंद रैना हे भारतीय लष्करात कार्यरत होते. ऑर्डनन्स फॅक्टरीत बॉम्ब बनवण्यात ते पारंगत होते. 1990 च्या दशकात काश्मिरी पंडितांच्या हत्येनंतर त्याच्या वडिलांनी गाव सोडले होते.

यानंतर हे लोक गाझियाबादमधील मुरादनगर येथे आले. त्यांना दोन मुले दिनेश आणि सुरेश आणि दोन मुली आहेत. सुरेश रैनाने 3 एप्रिल 2015 रोजी प्रियंकासोबत लग्न केले. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. काश्मिरी पंडित त्रिलोकचंद रैना यांनी आपल्या मुलांचे संगोपन करण्यासाठी खूप कष्ट घेतले.

Back to top button