शहरात घरफोड्यांचा सुळसुळाट; पाच घरफोड्यांत सव्वासात लाखांचा ऐवज चोरीला

File Photo
File Photo

पुणे : पुढारी वृत्तसेवा: शहरातील विविध भागांतील पाच घरफोड्यांत चोरट्यांनी 7 लाख 14 हजार रुपयांचा ऐवज चोरला. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुनी मंडाले लाईन रेंजहिल्स खडकी येथील विन्सी पंदनाल वर्गीस (वय 35) यांच्या बंद घरावर डल्ला मारून चोरट्यांनी चार सोनसाखळ्या, चार सोन्याच्या बांगड्या व एक अंगठी असा 5 लाख 32 हजार रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला. वर्गीस या खडकी येथील सैन्य दलाच्या रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. या प्रकरणी वर्गीस यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खडकी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

23 ते 24 जून या कालावधीत वर्गीस राहते घर बंद करून कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून मास्टर बेडरूमधील भिंतीच्या कपाटातील सोन्याचा ऐवज चोरला. दत्तनगर, आंबेगाव खुर्द येथे राहणारे जुनेद शेख (वय 28) यांचे मोबाईल दुकान बंद असताना चोरट्यांनी शटर उचकटून 47 हजार रुपयांचे मोबाईल, वायरलेस हेडफोन, घड्याळ चोरले.

या प्रकरणी शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 22 ते 23 जून या कालावधीत घडली. खडकी बाजार येथील यल्लालीग पांडुरंग पुजारी (वय 34) यांच्या न्यू सागर हॉटेल शॉपमध्ये चोरट्यांनी चोरी केली. हॉटेलच्या मागील किचनची जाळी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर गल्ल्यातील 7 हजार रुपयांची रोकड चोरली. या प्रकरणी पुजारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खडकी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

विश्रांतवाडीतून 33 हजारांचा ऐवज चोरीला
विश्रांतवाडी येथील प्रणयराज अपार्टमेंट विद्यानगर येथील नीलेश नारायण रोकडे (वय 37) यांच्या सदनिकेत देखील चोरट्यांनी चोरी केली आहे. सदनिकेचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा 95 हजार रुपयांचा ऐवज चोरला. याप्रकरणी रोकडे यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अलीफ टॉवर कोंढवा येथील जमीन जहांगीर (वय 39) यांच्या सदनिकेत चोरी करून चोरट्यांनी टॅब व रोकड असा 33 हजार रुपयांचा ऐवज चोरला. जहांगीर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कोंढवा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news