नगर : बिंगो जुगार अड्ड्यावर छापा | पुढारी

नगर : बिंगो जुगार अड्ड्यावर छापा

नगर : शहरातील माळीवाडा भागातील जिल्हा परिषदेच्या संरक्षण भिंतीलगत अतिक्रमण करून सुरू असलेल्या बिंगो जुगार अड्ड्यावर शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्या विशेष पथकाने छापा टाकला. या कारवाईमध्ये एकूण 32 हजार 780 रूपयांच्या मुद्देमालासह बिंगो जुगार चालविणार्‍या दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

रोहित रवींद्र कदम (वय 29, रा. जिल्हा परिषदेसमोर, माळीवाडा) व आकाश प्रकाश कदम (वय 26, रा. माळीवाडा) या दोघांविरूद्ध कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर आणि परिसरात अवैध धंदे चालविणार्‍यांविरूद्ध कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले आहेत. त्यानुसार पोलिसांकडून कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली असल्याने अवैध धंदे चालविणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

शहरातील माळीवाडा भागात बिंगो जुगार सुरू असल्याची माहिती शहर उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्या पथकाला कळल्यानंतर येथे छापा टाक्यात आला. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सागर राजेंद्र द्वारके यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक हेमंत खंडागळे, महेश मगर, सहाय्यक फौजदार दत्तात्रय शिंदे, हेड कॉन्स्टेबल तनवीर शेख, कॉन्स्टेबल सागर राजेंद्र द्वारके यांच्या पथकाने केली.

Back to top button