भाळवणी परिसरात पावसाचे आगमन | पुढारी

भाळवणी परिसरात पावसाचे आगमन

भाळवणी : यंदाचा पावसाळा सुरू झाल्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावली. परंतु, त्यानंतर संपूर्ण नक्षत्र कोरडे गेले.

परिसरातील शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत असताना तब्बल पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर आर्द्रा नक्षत्राच्या पहिल्या व दुसर्‍या दिवशी पावसाने सलग हजेरी लावल्याने शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पेरणीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या पावसामुळे आता मूग, बाजरी, कांदा तसेच वाटाणा पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

Back to top button