पुणे : एटीएसकडे तपास असलेल्या गुन्ह्यातील वाँटेड गुन्हेगाराला अटक

अटक
अटक
Published on: 
Updated on: 

पुणे : पुढारी वृत्तसेवा

दहशतवाद विरोधी पथकाकडील (एटीएस) अंमली पदार्थाच्या गुन्ह्यातील वाँटेड गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या अंमलीदार्थ विरोधी पथक एकने अटक केली. त्यांच्याकडून यावेळी 129 किलो गांजा, तसेच चार चाकी गाडीसह तब्बल 33 लाख 41 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कैलास साहेबराव पवार (35, गडदेवस्ती, डोंगर गाव, पेरणे, वाडे बोल्हाई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
दि. 5 फेब्रुवारी रोजी अमंली पदार्थ विरोधी पथक 1 चे कर्मचार्‍याला एटीएसच्या गुन्ह्यात वॉटेंड असलेला आरोपी कैलास पवार हा लोणीकंद परिसरातील डोंगरगाव येथे गांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी डोंगरगाव येथील गडदेवस्तीवरील पवारच्या घरावर छापा मारला. त्यावेळी त्याच्या घरासमोर उभ्या असलेल्या टॉयाटो गाडीत 128 किला 775 ग्रॅम गांजा सापडला.

याप्रकरणी अमंलदार मनोजकुमार साळुंके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणीकंद पोलिस ठाण्यात एनडीपीएस अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे, वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड, कर्मचारी सुजित वाडेकर, मनोज साळुंके, पांडुरंग पवार, विशाल दळवी, मारूती पारधी यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news