Vikram Kakade: विक्रम काकडेंच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादीत नाट्यमय घडामोडी; अखेर गोंधळावर पडदा

आजी-माजी आमदारांचा विरोध, सुनील टिंगरेंचाही अर्ज; अखेर विक्रम काकडे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार
Vikram Kakade
Vikram KakadePudhari
Published on
Updated on

पुणे: राष्ट्रवादी काँग््रेासच्या विधान परिषदेचा उमेदवार ठरविण्यावरून सोमवारी अखेरच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडल्या. विक्रम काकडेंच्या उमेदवारीवरून पवारांच्या जिजाई बंगल्यावर आजी-माजी आमदारांची नाराजी नाट्यातच भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांच्यासह विक्रम काकडेंचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला अन्‌‍ त्यानंतर शहराध्यक्ष सुनील टिंगरेंच्या उमेदवारी अर्जाने या सगळ्या गोंधळात आणखीच भर टाकली.

Vikram Kakade
Pune Poisonous Liquor Tragedy: विषारी दारूकांडानंतर संताप; ‘जीव गेल्यावरच यंत्रणा आणि राजकारण जागे होते का?’

विधान परिषदेची पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा राष्ट्रवादी काँग््रेासकडे राहणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण? याबाबत गोंधळ मात्र अखेरपर्यंत कायम राहिला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जिजाई या निवासस्थानी शनिवारी रात्री उशिरापर्यंत खासदार पार्थ पवार यांच्या उपस्थितीत इच्छुकांची बैठक झाली. मात्र, उमेदवार कोण? यावर निर्णय झाला नाही. रविवारी रात्री पुन्हा काही इच्छुकांची खासदार पवार यांची भेट घेतली. त्यात माजी खासदार काकडे व त्यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांच्या भेटीनंतर रात्री उशिरा विक्रम काकडेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यानुसार सोमवारी सकाळी बारा वाजता काकडे यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचे नियोजन केले होते.

Vikram Kakade
Uruli Kanchan Toxic Liquor Case: विषारी दारूकांड प्रकरणी उरुळी कांचनचे पोलिस निरीक्षक हटवले

आजी-माजी आमदारांची नाराजी

काकडे यांना उमेदवारी दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सोमवारी सकाळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी थेट जिजाई गाठली. त्यामध्ये माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार सुनील शेळके, चेतन तुपे, शंकर मांढेकर, शहराध्यक्ष सुनील टिंगरे, माजी आमदार अतुल बेनके हे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री व खासदार पवार यांच्यासमोर या सर्व आजी-माजी आमदारांनी पक्षातील बाहेरील व्यक्तीला उमेदवारी नको, अशी भूमिका घेत थेट काकडेंच्या उमेदवारीला विरोध केला. त्याच वेळी काकडे पिता-पुत्रही जिजाई बंगल्यावर पोहोचले. या वेळी भाजपच्या माजी खासदाराच्या मुलाला आपण उमेदवारी कशी द्यायची, असा थेट प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यानंतर काकडेंनी थेट राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची तयारी दर्शविली अन्‌‍ काही मिनिटांतच त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेशही झाला. दरम्यान, बैठकीतून बाहेर पडलेल्या शहराध्यक्ष टिंगरे यांनाही अर्ज भरण्याचे आदेश पार्थ यांच्याकडून देण्यात आला. त्यामुळे राष्ट्रवादीचा नक्की उमेदवार कोण? असा गोंधळ निर्माण झाला.

Vikram Kakade
Haveli Adarsh School Scheme: हवेलीतील 32 जिल्हा परिषद शाळांची ‘आदर्श शाळा’ योजनेसाठी निवड

पक्षाच्या कार्यालयात गोंधळच, गोंधळ

जिजाईतून बाहेर पडल्यानंतर टिंगरे आणि काकडे या दोघांनी शहर कार्यालय गाठले. या दोघांनीही पक्ष कार्यालयात बसून एकत्र उमेदवारी अर्जही भरले. या वेळी पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म नक्की कोणाला देणार, याबाबतचे चित्र अस्पष्ट होते. या वेळी टिंगरे समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी दोन वाजता या दोघांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केले. या वेळी आमदार वळसे पाटील यांच्यासह जय पवार यांनी विक्रम काकडे हेच पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचे स्पष्ट केले. अन्‌‍ त्यानंतर या सगळ्या गोंधळावर पडदा पडला.

पदाधिकाऱ्यांचे नाराजीनामा अस्त्र

काकडेंची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचे अस्त्र उपसले. सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष निखिल गायकवाड, युवकचे शहर उपाध्यक्ष मोरेश्वर चांदेरे, युवकचे प्रदेश सरचिटणीस किरण खैरे, माजी शहराध्यक्ष महेश हांडे, उपाध्यक्ष रूपेश गायकवाड, शेखर हरणे, प्रदेशचे स्वप्निल पठारे, वैभव पंचमुख, रोहित बनकर यांनी थेट राजीनामा देत काकडेंच्या उमेदवारीला विरोध केला. ज्या काकडेंनी 2017 ला महापालिका निवडणुकीत स्व. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांच्या मुलाला उमेदवारी दिल्याने नाराजी व्यक्त करीत काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला.

Vikram Kakade
Bhimashankar Temple Online Booking: भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून खुले; दररोज 1000 भाविकांसाठी दर्शन

सासऱ्यानंतर जावयाला विधान परिषदेची संधी

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबल्यामुळे तब्बल चार वर्षे विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लांबली होती. या दरम्यान याआधी या जागेवर राष्ट्रवादी काँग््रेासचे अनिल भोसले हे तब्बल दोन वेळा आमदार होते. त्यानंतर आता त्यांचेच जावई विक्रम काकडे यांना संधी मिळाली. त्यामुळे सासऱ्यानंतर त्यांच्या जागेवर जावई आता विधान परिषदेत जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काकडेंच्या उमेदवारीत भाजपची भूमिका निर्णायक

पुण्याची जागा राष्ट्रवादीला मिळाली, तर विक्रम काकडेंच्या रूपाने उमेदवारीत भाजपचीच भूमिका निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. संजय काकडे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळे विक्रम यांच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची ठरली असल्याचे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news