

लोणी काळभोर: हवेली तालुक्यातील विविध क्लस्टरमधील 32 जिल्हा परिषद शाळांची ‘आदर्श शाळा’ योजनेसाठी निवड करण्यात आली असून, या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. ग््राामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांप्रमाणे शैक्षणिक सुविधा मिळाव्यात आणि शाळांचा सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे.
आदर्श शाळा योजनेसाठी निवड झालेल्या शाळांमध्ये जि. प. प्राथमिक शाळा वडकीनाला, गायकवाडवाडी, मोकारवाडी, वाघमारेवस्ती, बुर्केगाव, नगरमळवाडी, तुळापूर, जालनवाडी, तरडे खालचे, पेठ, तारमळा, श्रीरामनगर, खेड शिवापूर, खामगाव टेक, उर्दू शाळा उरुळी कांचन, आष्टापूर, माळवाडी आष्टापूर, बोल्हाई मंदिर, बांगारवस्ती, कोलवडी, आळंदी म्हातोबा, नायगाव, कदमवस्ती, वाकवस्ती, मोगरवाडी, न्हावी सांडस, काळकवाडी, विठ्ठलवाडी (देहू), माळवाडी (देहू), जांभळी आणि आगळांबे येथील शाळांचा समावेश आहे.
शिक्षण विभागाच्या माहितीनुसार, निवड झालेल्या शाळांसाठी टप्प्याटप्प्याने निधी वितरित केला जाणार असून संबंधित गटशिक्षणाधिकारी स्तरावरून आवश्यक आराखडे आणि कामांचे नियोजन सुरू करण्यात आले आहे.
काही शाळांमध्ये वर्गखोल्यांची कमतरता, इमारतींची दुरवस्था, संगणक कक्ष व ग््रांथालयाचा अभाव, स्वच्छतागृहांची आवश्यकता तसेच विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित व डिजिटल शिक्षण व्यवस्था उभारण्याची गरज असल्याने या शाळांची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
हवेली तालुक्यातील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण विभाग सातत्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मेहनत घेत आहेत. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी शिक्षकांनी केलेल्या चांगल्या कामाची दखल शासनस्तरावर घेतली जात आहे. त्यामुळेच हवेलीतील अनेक शाळांची आदर्श शाळा योजनेसाठी निवड झाली आहे. भविष्यात या शाळा ग््राामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील.
हेमंत खाडे, गट शिक्षणाधिकारी, हवेली