Bhimashankar Temple Online Booking: भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून खुले; दररोज 1000 भाविकांसाठी दर्शन

ऑनलाइन नोंदणी सुरू; 5 जूनपासून प्रक्रिया, 15 ते 30 जूनदरम्यान वेळेचे बंधन व मर्यादित प्रवेश
Online Application
Online ApplicationPudhari
Published on
Updated on

मंचर: तब्बल पावणेपाच महिन्यांपासून बंद असलेले श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून भाविकांसाठी पुन्हा खुले होणार आहे. मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी व्यवस्था सुरू केली आहे. त्याद्वारे दररोज 1 हजार भाविकांना दर्शन मिळणार आहे. 5 जूनपासून नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. भाविकांना मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावरून नोंदणी करून दर्शन घेता येणार आहे.

Online Application
Panshet Bridge Closed: पानशेत-वेल्हे जुना पूल वाहतुकीसाठी बंद; 15 गावांचा संपर्क तुटला

जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, 15 ते 30 जून या कालावधीत ऑनलाइनद्वारे नोंदणी केलेल्या भाविकांना दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. सकाळी 11 वाजल्यानंतर दर्शन बंद करून विकासकामे सुरू केली जातील. निर्धारित वेळेत दररोज केवळ 1 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. नोंदणी केलेल्या भाविकांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दर्शनासाठी येताना वैध ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे.

Online Application
Baramati Hailstorm Crop Damage: बारामतीत वादळी पाऊस व गारपीट; शेतपिकांचे मोठे नुकसान

भाविकांसाठी ऑनलाइन नोंदणी व दर्शनाची सुविधा मंदिर व्यवस्थापन समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. संकेतस्थळ हीींंीि:/// ीहीशश लहळारीहरपज्ञरी. लेा याप्रमाणे आहे. प्रसिद्धीपत्रकात दर्शनासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार असल्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. उपलब्ध माहितीनुसार ऑनलाइन नोंदणी व नियमित दर्शनासाठी स्वतंत्र शुल्क नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Online Application
Pune Sex Workers Digital Literacy: पुण्यात देहविक्रय करणाऱ्या महिलांचे डिजिटल सशक्तीकरण; आयुष्यात नवा आत्मविश्वास

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या भव्य सभामंडप, दर्शनबारी, पायरी मार्ग तसेच भाविक सुविधांच्या कामांना अंतिम स्वरूप आले आहे. मंदिर परिसर भाविकांसाठी अधिक सुसज्ज करण्यात येत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सूर्यकांत कुंभार यांनी दिली.

Online Application
Pune Foreign Currency Robbery Arrest: पेपर स्प्रे हल्ला करून २५ लाखांची लूट; सहकारनगर पोलिसांची मोठी कारवाई

ऑनलाइनद्वारे नोंदणी केलेल्या भाविकांनी निर्धारित दिलेल्या वेळेत दर्शन घ्यावे. वाहन पार्किंग 2 नंबर पार्किंगमध्ये करावे. नियमांचे पालन भाविकांनी करून देवस्थान आणि प्रशासनाला सहकार्य करावे.

सुरेश कौदरे, अध्यक्ष, भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news