Uruli Kanchan Toxic Liquor Case: विषारी दारूकांड प्रकरणी उरुळी कांचनचे पोलिस निरीक्षक हटवले

22 जणांच्या मृत्यूनंतर मोठी प्रशासकीय कारवाई; सचिन वांगडे मुख्यालयाशी संलग्न, विजयमाला पवार यांच्याकडे जबाबदारी
Police
Police Pudhari
Published on
Updated on

लोणी काळभोर/उरळी कांचन: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांड प्रकरणात पुणे ग््राामीण पोलिसांनी मोठी प्रशासकीय कारवाई करीत उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांची उचलबांगडी केली आहे. त्यांना मुख्यालयाशी संलग्न करण्यात आले असून, त्यांच्या जागी पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Police
Haveli Adarsh School Scheme: हवेलीतील 32 जिल्हा परिषद शाळांची ‘आदर्श शाळा’ योजनेसाठी निवड

प्राथमिक तपासात विषारी दारूचा पुरवठा उरुळी कांचन परिसरातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याचे समजते. या प्रकरणात आत्तापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला असून, राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.

Police
Bhimashankar Temple Online Booking: भीमाशंकर मंदिर 15 जूनपासून खुले; दररोज 1000 भाविकांसाठी दर्शन

तपासादरम्यान अवैध दारूनिर्मिती, साठवणूक आणि पुरवठासाखळीचे विस्तृत जाळे उघडकीस येत आहे. यामुळे संबंधित यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अवैध दारू व्यवसायाकडे दुर्लक्ष, नियंत्रणात अपयश आणि निष्काळजीपणाच्या आरोपांवरून यापूर्वीही विविध विभागांतील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

Police
Panshet Bridge Closed: पानशेत-वेल्हे जुना पूल वाहतुकीसाठी बंद; 15 गावांचा संपर्क तुटला

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात पुणे पोलिस, पिंपरी-चिंचवड पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील मिळून 22 अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक तसेच उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Police
Baramati Hailstorm Crop Damage: बारामतीत वादळी पाऊस व गारपीट; शेतपिकांचे मोठे नुकसान

उरुळी कांचन परिसरातून विषारी दारूचा पुरवठा झाल्याच्या संशयावरून थेट पोलिस निरीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायाला पाठीशी घालणाऱ्या किंवा त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना स्पष्ट इशारा मिळाल्याची चर्चा आहे. दरम्यान, नव्याने पदभार स्वीकारलेल्या पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांच्यासमोर परिसरातील अवैध दारू व्यवसायाचे समूळ उच्चाटन, पुरवठासाखळी उद्ध्‌‍वस्त करणे आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आव्हान असणार आहे. स्थानिक नागरिकांनीही या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news