file photo
file photo

पुणे: तळेगाव येथे भरदिवसा चोरी

Published on

तळेगाव स्टेशन, पुढारी वृत्तसेवा: तळेगाव दाभाडे स्टेशन भागात गुरुवारी (दि.१५) दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास २२, रुद्र अपार्टमेंट, वनश्रीनगर येथे चोरी झाल्याची फिर्याद नंदकिशोर किसन कावळे(वय ३५) यांनी दिली. सुमारे ५० हजार रुपये किंमतीचे सोने आणि चांदीचे दागिने चोरीस गेले आहेत. फिर्यादी कामावर जात असताना त्यांच्याकडून घराचा दरवाजा उघडा राहिला होता. फिर्यादीची पत्नी आणि भावजय मुलांना शाळेतून आणण्यासाठी गेल्या असताना अनोळखी महिला फिर्यादीच्या घरात घुसली. तिने घरातील मुलांना विचारले आई कोठे गेली आहे? त्यावर मुलांनी सांगितले की, आई शाळेत गेली आहे. ही संधी साधून तिने चोरी केली. अज्ञात महिले विरुध्द तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news