यात्रा लग्नसराईमुळे नारळ खातोय भाव; या राज्यातून मोठ्या प्रमाणात आवक

यात्रा लग्नसराईमुळे नारळ खातोय भाव; या राज्यातून मोठ्या प्रमाणात आवक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले गेल्यानंतर यात्रा, उत्सव, लग्नसराईला गर्दी होत आहे. त्यामुळे नारळाला मागणी वाढली आहे. कोरोना टाळेबंदीचा गेल्या 2 वर्षात नारळाच्या मागणीवर मोठा परिणाम झाला होता. लग्न समारंभ, यात्रा, उत्सव, जाहीर कार्यक्रम यावर निर्बंध होते. निर्बंध हटवले गेल्याने नारळाला मागणी वाढली आहे.

तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथून नारळाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. नव्या नारळाला जास्त मागणी आहे. नव्या नारळाचा वापर जत्रेत केला जातो. सफसोल आणि मद्रास जातीचा नारळ वापरला हॉटेल व अन्नपदार्थ बनवायला वापरतात. पालकोल नारळाला किरकोळ दुकानदारंकडून मागणी आहे.

नारळाच्या पोत्याचा भाव

नारळाच्या जाती                 भाव
नवा नारळ                   1050 ते 1300 रु.
पालकोल                     1350 ते 1500 रु.
साफसोल                     2000 ते 2600 रु.
मद्रास                         2600 ते 2800 रु.

कोरोनानंतर सर्व निर्बंध हटवल्यानंतर यात्रा, जत्रा सुरू झाल्या आहेत. लग्न सराई आणि कार्यक्रमांमुळे केटरिंग आणि हॉटेल व्यावसायिकांकडून नारळाला मागणी वाढली आहे.
– जगदीश मुंदडा, नारळाचे व्यापारी

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news