स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षांच्या वडिलांचा जीवन संपवण्याच्या प्रयत्न

स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षांच्या वडिलांचा जीवन संपवण्याच्या प्रयत्न

मंचर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांचे वडील गोपाळा भाऊ बांगर (वय ७५) यांनी कीटकनाशक औषध सेवन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (दि. ३) सकाळी पिंपळगाव खडकी येथील राहत्या घरी घडली. त्यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी आणले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर यांच्यावर एकलहरे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही लोकांनी हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला होता. ही घटना प्रभाकर बांगर यांचे वडील गोपाळा भाऊ बांगर यांना समजताच त्यांनी औषध घेऊन टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांचे नातू आकाश बांगर यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news